Sushant Suicide: यशराज फिल्म्सच्या आदित्य चोप्रा यांची ४ तास पोलिसांनी केली चौकशी

Sushant Suicide: यशराज फिल्म्सच्या आदित्य चोप्रा यांची ४ तास पोलिसांनी केली चौकशी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. कमीत कमी वेळात पोलिस बर्‍याच मोठ्या लोकांची चौकशी करून हे प्रकरण त्वरित सोडवण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान सुशांत सिंह राजपूत प्रकरणी YRF यशराज फिल्मचे प्रमुख आदित्य चोप्रा याची चौकशी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

आदित्य चोप्रांची पोलिसांकडून कसून चौकशी

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी मुंबई पोलिसांनी वर्सोवा स्थानकात आदित्य चोप्रा यांचे जबाब नोंदविला. पोलिसांनी आदित्य यांची संपूर्ण ४ तास चौकशी केली. पोलिसांनी कोणत्या प्रश्नांची विचारपूस केली आहे. आणि त्यावर आदित्य यांनी काय म्हटले आहे याबद्दल आतापर्यंत औपचारिक विधान जारी झाले नाही. पण सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी यशराज फिल्म्सचा अँगल देखील खूप महत्वाचा आहे. सुशांतने YRF बरोबर कोणता करार केला आहे का? हे समजून घेण्याचा पोलिसांनी बर्‍याच वेळा प्रयत्न केला आहे. हेच जाणून घेण्यासाठी आता आदित्य चोप्रा यांचीही चौकशी केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीने सांगितले होते की, सुशांतने स्वत: नुकताच YRF बरोबरचा करार संपवला होता तसेच त्याने रियालाही असे करण्यास सांगितले होते. पोलिसांनी रियाचे ते विधानही नोंदवले होते. अशा परिस्थितीत पोलिसांनी आदित्य यांना या संदर्भात विचारपूस केली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे CBI चौकशीची मागणी केली आहे. रियाने ट्विट करुन पहिल्यांदाच सांगितले आहे की, ‘मी सुशांतची गर्लफ्रेंड आहे’.

असे म्हणाली रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्तीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आदरणीय अमित शहाजी, मी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड आहे. सुशांतला जाऊन आता एक महिना झाला आहे. तसेच माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. पण, मी सुशांतला न्याय मिळावा याकरता तुमच्याकडे हात जोडून मागणी करते की, याप्रकरणी सीबीआयची चौकशी करावी. कारण मला जाणून घ्यायचे आहे की, सुशांतने एवढे गंभीर पाऊल का उचले आहे’?


Sushant Suicide: आरोप सिद्ध न झाल्यास ‘पद्मश्री’ परत करणार- कंगणा

First Published on: July 18, 2020 4:07 PM
Exit mobile version