सुशांत सिंग ड्रग्सप्रकरणी रिया चक्रवर्ती सुनावणीला गैरहजर, २२ जूनला आरोप निश्चिती होणार?

सुशांत सिंग ड्रग्सप्रकरणी रिया चक्रवर्ती सुनावणीला गैरहजर, २२ जूनला आरोप निश्चिती होणार?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत ड्रग्सप्रकरणी (Sushant Singh drugs case) रिया चक्रवर्तीविरोधात (Actor Rhea Chakraborty) सुनावणी सुरू आहे. आज विशेष एनडीपीएस कोर्टासमोर (Special NDPS court) झालेल्या सुनावणीत रिया चक्रवर्ती गैरहजर होती. आता याप्रकरणी पुढील सुनावणी २२ जून रोजी होणार आहे. पुढच्या सुनावणीत रियावरील आरोप निश्चित होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. (Sushant Singh case : Riya Chakraborty absent for hearing, charges to be confirmed on June 22?)

कोर्टात उपस्थित न राहण्याची परवानगी रिया चक्रवर्ती हिने वकिलांमार्फत मागितली होती. त्याप्रमाणे ती आज कोर्टात गैरहजर राहिली. ती आजच्या सुनावणीला न आल्याने आता पुढची सुनावणी २२ जून रोजी होणार आहे. मात्र, पुढच्या सुनावणीत तिच्यावरील आरोप निश्चित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणातील सर्व आरोपींना पुढच्या सुनावणीवेळी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुशांत सिंग मृत्यूप्रकरणात ३५ आरोपी आहे. यापैकी ३० आरोपी जामिनावर सुटले असून ५ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. २ ते ६ जून दरम्यान झालेल्या आयफा अॅवॉर्ड कार्यक्रमात सहभागी होण्याकरता रियाला न्यायालयाने परवानगी दिली होती. मात्र, ती या कार्यक्रमालाही उपस्थित राहिली नाही.

२०२० मध्ये रियाविरोधात एनसीबीने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी चौकशी करण्या करता ६ ते ८ सप्टेंबर २०२० दरम्यान तिला बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर, ८ सप्टेंबर २०२० रोजी चौकशीदरम्यान तिला अटक करण्यात आली. यावेळी कोर्टाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२० मध्ये तिला कोर्टाने तिच्या जामिनावर अर्जावर मंजुरी दिली.

First Published on: June 7, 2022 8:09 PM
Exit mobile version