सुशांत आणि अंकिताचं ‘ते’ गाणं होतंय व्हायरल

सुशांत आणि अंकिताचं ‘ते’ गाणं होतंय व्हायरल

सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर चाहते त्याचे जुने व्हिडीओ शेअर करत त्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत. सुशांतसिंग राजपूतने अतिशय कमी वेळात आपल्या अभिनयाने आणि स्वभावाने लोकांना वेड लावलं होतं. आता त्याचं आणि अंकिता लोखंडेचं एक जुनं गाणं व्हायरल होत आहे. सुशांत जेव्हा मालिकांमध्ये काम करायचा, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.

‘जैसी हो वैसी रहो’ असं सुशांत आणि अंकिता लोखंडे यांच्या या व्हिडीओ गाण्याचं नाव आहे. हे गाणं प्रदर्शित झालं नव्हतं. मात्र, आता हे गाणं सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सुशांत आणि अंकिता रोमँटिक स्टाईलमध्ये दिसत आहेत. सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचं ‘जैसी हो वैसी रहो’ हे गाणं यूट्यूबवर १ कोटी ६४ लाखाहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. लोकांना हे गाणं खूप आवडलं आहे. अंकिता लोखंडे आणि सुशांतसिंग राजपूत सुमारे ६ वर्ष एकमेकांना डेट करत होते. यानंत दोघांचं ब्रेकअप झालं. दोघांच्या ब्रेकअपने चाहतेही चकित झाले होते. दरम्यान, सुशांतसिंग राजपूत हे १४ जून रोजी त्याच्या निवासस्थानी आत्महत्या केली. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.

 

First Published on: July 8, 2020 6:45 PM
Exit mobile version