सुशांतने आईसाठी लिहिलेली भावनिक इन्स्टाग्राम पोस्ट ठरली अखेरची…

सुशांतने आईसाठी लिहिलेली भावनिक इन्स्टाग्राम पोस्ट ठरली अखेरची…

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या वांद्र्यातील राहत्या घरी केलेल्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सुशांत काही दिवसांपासून नैराश्यात होता अशी माहिती आता समोर येत आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजर असलेल्या दिशाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून तो अस्वस्थ असलेल्याचे सांगण्यात येत आहे.

सुशांतच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांमध्ये त्याची चर्चा होताना त्याच्या अखेरच्या पोस्टची देखील चर्चा सुरू आहे. सुशांतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये माँ असे लिहिले होते. त्याची हिच पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. त्याच्या आईचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले होते.

 

सुशांत लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले होते. काही दिवसांपुर्वी ‘अश्रूंनी अंधुक झालेला भूतकाळ आणि हसतमुख क्षणभंगुर आयुष्य. या दोघांमधील संभाषण म्हणजे आई”, असे लिहित त्याने ही भावनिक पोस्ट शेअर केली होती. दरम्यान, सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असे म्हटले जात आहे. दरम्यान पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट मिळालेली नाही. अद्याप या घटनेचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना या घटनेबद्दल फोन करून याबाबत माहिती दिली असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती मिळाली असून आपल्या वाद्र्यातील राहत्या घरातील एका खोलीत त्याने पंख्याला गळफास घेत जीवन संपवले. काही दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजर असलेल्या मुलीने आत्महत्या केली होती.  तेव्हापासून होता डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे.


बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने केली आत्महत्या!
First Published on: June 14, 2020 4:59 PM
Exit mobile version