‘त्या रात्री ५ ते ६ जण सुशांतच्या घरी आले होते’, सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण

‘त्या रात्री ५ ते ६ जण सुशांतच्या घरी आले होते’, सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने झाले आहेत. सुशांत प्रकरणाचा तपास ईडी, सीबीआय आणि महाराष्ट्र पोलीस करत आहेत. तिनही यंत्रणांना रोज नवे नवे दुवे मिळत आहेतच. शिवाय सुशांत प्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक बाबी माध्यमांच्या समोर येत आहेत. सुशांतचा जवळचा मित्र आणि कोरिओग्राफर गणेश हिवरकर (Ganesh Hiwarkar) यानेही एका वृत्तवाहिनीवर बोलताना धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. १३ जूनच्या रात्री सुशांतच्या फ्लॅटवर ५ ते ६ जण आले होते, असा दावा गणेशने केला आहे.

दिसा सालियनच्या मृत्यूनंतर सुशांत तणावात होता. तसेच तिच्या मृत्यूच्या सत्यतेबाबत त्याला कल्पना होती. या अस्वस्थतेतूनच तो पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा करणार होता, अशीही माहिती आता समोर आली आहे. दिशा सालियनच्या मृत्यूचा संबंध सुशांत प्रकरणाशी असल्याचे गणेश हिवरकरने सांगितले.

गणेश हिवरकरने ही माहिती सुशांतचा आणखी एक मित्र संदीप सिंहच्या हवाल्याने केली आहे. संदीपला सुशांतच्या मृत्यूचे सत्य माहीत असून देखील तो खोटा बोलत असल्याचा आरोप गणेशने केला. गणेश एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला की, “संदीपच्या टीममधील माझ्या काही सूत्रांनी सांगितले की, संदीपला सुशांतच्या हत्येची माहिती आधीपासूनच होती. सुशांत दिशाच्या प्रकरणात मोठा खुलासा करणार होता, त्यामुळेच त्याची हत्या झाली. मात्र मुंबई पोलीस या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरुप देत आहेत, जे चुकीचे आहे.”

गणेश पुढे म्हणाला की, “या हत्येमागे ज्या ज्या लोकांचा हात आहे, त्यांचा खुलासा सीबीआय समोर करायचा आहे. यासाठी मला पोलीस सरंक्षण हवे आहे. तसेच १३ जूनच्या त्या रात्री पार्टीत कोण कोण सहभागी झाले होते. त्यांची देखील नावे मला माहीत असून ती देखील जाहीर करणार आहे.”

First Published on: August 17, 2020 12:00 AM
Exit mobile version