सुष्मिता सेनचा साखरपुडा झाला? इंस्टाग्रामवर फोटो अपलोड

सुष्मिता सेनचा साखरपुडा झाला? इंस्टाग्रामवर फोटो अपलोड

अभिनेत्री सुष्मिता सेन आपल्या प्रियकर रोहमन शॉल सोबतच्या नात्याबद्दल खूप गंभीर आणि भावनिक आहे. हे त्यांच्या इंस्टाग्रामच्या पोस्टवरून बऱ्याचदा बघायला मिळते. दोघांचे एकमेकांवर इतके प्रेम आहे की, दोघांचे सोबतचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतात. नुकताच सुष्मिताने शेअर केलेले नवे फोटो पाहून त्यांच्या नात्यांबद्दल चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर चर्चा होताना दिसतेय. अभिनेत्री सुष्मिता चित्रपटांपासून लांब असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असते.

इंस्टाग्रामवर सुष्मिताने तिचा आणि रोहमनचा सेल्फी शेअर केला आहे. नेहमीप्रमाणेच दोघे ही सुंदर दिसत आहे. यावेळी सुष्मिताने शेअर केलेल्या फोटोत तिने घातलेल्या अंगठीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने शेअर केलेल्या फोटोत सुष्मिताच्या हातात नीलम आणि हिऱ्यांची अंगठी तिने घातली होती. फोटोसोबत सुष्मिताने लिहिलेला मॅसेज ही खूप रोमॅटिक आहे, जो तिच्या प्रियकरासाठी प्रेम व्यक्त करतो.


‘एखाद्यावर कोणत्याही अटींशिवाय प्रेम करणे कठीण आहे कारण अटींचे पालन करण्याची सवय आहे. हृदयाचे ऐकून एखादा निर्णय घेणं खूपच अव्हानात्मक असते. जेव्हा काही अटी डोक्यात असतात तेव्हा मनात विश्वास निर्माण होतो. अशावेळी प्रेम हे बोनस सारखे होते.’ ‘मैत्री, प्रेम, सन्मान, विश्वास, साथ आणि आपल्या हृदयाचे ऐकण्यासाठी मी कोणत्याही अटींशिवाय तुझी आहे रोहमन..’ असे ही ती म्हटली.

सुष्मिताच्या हातात दिसत असलेली सुंदर अंगठी आणि तिची रोमॅटिक पोस्ट बघून सध्या तरी खरे काय आहे हे समोर आले नाही. परंतु, दोघांचे चाहते यांच्यातील प्रेमाला बघून खूश आहेत.

First Published on: April 28, 2019 2:54 PM
Exit mobile version