चाहत्यांच्या ‘टॅटू’ने स्वप्नील जोशी झाला भावूक!

चाहत्यांच्या ‘टॅटू’ने स्वप्नील जोशी झाला भावूक!

स्वप्निल जोशी (फाईल फोटो)

कलाकारांवर प्रेम करणारे त्यांचे चाहते आपलं प्रेम कशाप्रकारे व्यक्त करतील याचा काही नेम नसतो. कलाकारांशी भावनिक नातं जोडू पाहणारे त्यांचे चाहते त्यांना जमेल त्याप्रकारे आपल्या आवडत्या कलाकाराला पोचपावती देत असतात. मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशी. स्वप्निलच्या दोन फॅन्सनी त्याला अशाचप्रकारे हटके भेट दिली आहे. करुणा कदम आणि कुणाल शिंदे हो दोन तरूण स्वप्निल जोशीचे चाहते आहेत. स्वप्नीलवरचं आपलं प्रेम दाखवण्यासाठी या दोघांनी चक्क एक परमनंट टॅटू गोंदवून घेतला आहे. हा टॅटू दुसरा तिसरा कशाचा नसून या दोघांच्या लाडक्या स्वप्नील जोशीचाच आहे. करुणाने स्वप्नीलचं नाव आपल्या खांद्याजवळ नोंदवून घेतलं आहे, ज्यावर एक इन्स्टाग्रामचा लोगोसुद्दा आहे. तर, कुणालने स्वप्नीलचा फोटो गोंदवून घेतला आहे. स्वत:च्या शरीरावर अशाप्रकारे टॅटू गोंदवून घेण्यावरुनच या दोघांचं स्वप्नील जोशीवरील प्रेम दिसून येतं.

 

स्वप्नील जोशी झाला भावूक

करुणा आणि कुणाल यांनी गोंदवलेले हे टॅटू पाहिल्यानंतर स्वत: स्वप्नील जोशी चांगलाच भावूक झाला. आपल्या प्रेमापोटी चाहत्यांनी दिलेली ही टॅटूरुरपी भेट स्वप्नीलला खूपच आवडली. चाहते माझ्यावर किती प्रेम करतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आल्याचंही तो म्हणाला. ‘प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे आता कामाप्रती माझी जबाबदारी अधिक वाढली असून, मी योग्यरित्या ती पेलवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या रसिकांना कधीही निराश करणार नाही’, अशी भावना स्वप्नीलने व्यक्त केली.


वाचा: सचिन पिळगांवकरांचा ‘हा’ नवीन चित्रपट लवकरच…

First Published on: October 17, 2018 7:57 PM
Exit mobile version