रश्मि रॉकेट: तापसीने घेतलेली मेहनत बघून व्हाल हैराण

रश्मि रॉकेट: तापसीने घेतलेली मेहनत बघून व्हाल हैराण

रश्मि रॉकेट: तापसीने घेतलेली मेहनत बघून व्हाल हैराण

बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा म्हणजे तापसी पन्नू. बॉलिवूडची ही हरहुन्नरी अभिनेत्री २०२१मध्ये एका जबरदस्त चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘रश्मि रॉकेट’ असे आहे. या चित्रपटात तापसी एका Athletic
गर्लच्या रुपात दिसणार आहे. आपली भूमिका चांगल्या प्रकारे साकारण्यासाठी तापसीने खूप ट्रेनिंग घेतली आहे. तसेच ती आगामी ‘रश्मि रॉकेट’ चित्रपटासाठी अधिक तयारी करत आहे. ती चित्रपटासाठी करत असलेली मेहनत तिच्या एका व्हिडिओतून दिसत आहे.

तिच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिने खूप सारी मेहनत केली आहे. पण चित्रपटाच्या तिसऱ्या दिवशी शूटिंग थांबवले. कारण तापसीने भूमिकेसाठी जी ट्रेनिंग घेतली होती, त्यामुळे ती चालू शकत नाही नव्हती.

दरम्यान तापसीने टीझरसोबत आपल्या पूर्ण व्हिडिओ अपलोड करण्याचे वचन चाहत्यांना दिले आहे. ती उद्या म्हणजेच १७ डिसेंबर २०२० पूर्ण व्हिडिओ शेअर करेल. तापसीने हे देखील सांगितले की, ‘आज ट्रेनिंगचा शेवटाचा दिवस आहे.’ व्हिडिओ शेअर करताना तिने सांगितले आहे की, ‘जसे मी आज #RashmiRocket साठी शेवटची Athletics
ची ट्रेनिंग पूर्ण केली आहे. मी आपला पूर्ण व्हिडिओ शेअर करत आहे, ज्याची मी बरीच प्रतीक्षा करत होती.’

तापसीने ‘रश्मि रॉकेट’च्या शूटचे प्रत्येक अपडेट शेअर केले होते. त्याचसोबत तिने चाहत्यांना आपल्या ट्रान्सफॉर्मेशनबाबत सांगितले. तिचा हा व्हिडिओ एक टीझर होता. उर्वरित पूर्ण व्हिडिओ उद्या सोशल मीडियावर दिसणार आहे. हा चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा आहे, ज्यामध्ये तापसी, अभिषेक बनर्जी, प्रियांशु पेनयुली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश खुरानाने केले आहे आणि रॉनी स्क्रुवाला, नेहा आनंद आणि प्रांजल खंडडियाने निर्मिती केली आहे.


हेही वाचा – जामीन मिळताच भारतीने ‘द कपिल शर्मा शो’च्या शूटिंगला केली सुरुवात


 

First Published on: December 16, 2020 3:37 PM
Exit mobile version