तापसी आणि भूमी पेडणेकर जेव्हा गोवऱ्या थापतात

तापसी आणि भूमी पेडणेकर जेव्हा गोवऱ्या थापतात

सांड की ऑंख

अभिनेत्री तापसी पन्नू सध्या सातव्या आसमानवर आहे. तापसी आणि अमिताभ यांची बदला हा चित्रपट बॉक्सऑफिसवर तुफान कमाई करत आहे. या आधी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर तापसी ‘पिंक’ चित्रपटातही दिसली होती. त्यादोघांची केमेस्ट्री नेहमीच हीट ठरली आहे. ‘पिंक’ प्रमाणेच बदलालाही प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहे. पण तापसीला ‘बदला’ चित्रपटाच यश साजरं करायला वेळच नाहीये. कारण तापसी सध्या अनुराग कश्यपच्या ‘सांड की आंख’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. नुकतच या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक फोटो समोर आला आहे. या पोस्टरवरून चित्रपटाचा थोडाफार अंदाज आपल्याला लावता येईल.

चित्रपटविश्लेषक तरण आदर्शने आपल्या ट्विटरवून हे पोस्टर शेअर केलं आहे. या फोटोमध्ये दोन महिला गोवऱ्या थापताना दिसत आहेत. गोवऱ्या थापणाऱ्या या महिलांची वेशभूषा गावाकडची आहे. मात्र या दोघींची पाठ असल्यामुळे या अभिनेत्री नेमक्या कोण आहेत हे कळत नाहीये. या दोन महिला तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण या चित्रपटाची घोषणा करताना तापसीने एक फोटो शेअर केला होता. त्यात अनुराग कश्यप आणि भूमी पेडणेकर दिसत होते. त्याचबरोबर हा फोटो तापसीने हा फोटो आपल्या इन्स्टा अकाऊंटवरही शेअर केला आहे.

 

‘सांड की आँख’ हा चित्रपटाची निर्मीती निधी परमार आणि अनुराग कश्यम करत आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी करत आहेत. चित्रपटात अनुराग कश्यप आणि भूमी पेडणेकर यांच्याबरोबर प्रकाश झा आणि विनीत सिंग महत्त्वाच्या भुमिकेत आहेत. त्याचप्रमाणे आणखी कोण कोण या चित्रपटात असणार ही नावं ही लवकरच कळतील.  चित्रपटाचे चित्रीकरण सध्या दिल्ली जवळच्या एका गावात सुरू आहे. चित्रपटाची कथा काय असणार आहे हे सध्या गुलदस्त्यात आहे.

First Published on: March 12, 2019 10:23 AM
Exit mobile version