लवकरच दयाबेन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दिसणार

लवकरच दयाबेन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दिसणार

लवकरच दयाबेन 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दिसणार

गेल्या कित्येक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही हिंदी मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. नुकतेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेचे ३ हजार भाग पूर्ण झाले आहेत. या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी म्हणजेच दयाबेन घराघरात लोकप्रिय झाली. पण गेल्या काही वर्षापासून दिशा वकानी या मालिकेतून गायब झाली आहे. चाहते तिला मालिकेत पुन्हा पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. माहितीनुसार दिशा वकानी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये कमबॅक करणार आहे.

नवरात्री किंवा दिवाळीच्या आधी दिशा वकानी म्हणजेच दयाबेन मालिकेत कमबॅक करणार आहे. दयाबेनची गरबा खेळण्याची स्टाईल ही खूप प्रसिद्ध आहे आणि दयाबेनला गरबा खेळायला खूप आवडतो. त्यामुळे नवरात्रीमध्ये दयाबेनचे मालिकेत होणारे कमबॅक हे योग्य ठरले.

जर दिशा वकानी मालिकेत परतली नाही तर दयाबेनच्या पात्रासाठी इतर अभिनेत्रीची निवड केली जाणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे. या मालिकेतीले सर्वांचे आवडते पात्र असणार दयाबेन हिला निर्मात्यांना चाहत्यांपासून लांब ठेवायचे नाही आहे. पण दिशा वकानी हिच्या कुटुबांकडून अनेक प्रकारच्या अटी असल्यामुळे तिला पुन्हा मालिकेत येणे अवघड होत आहे. तरीपण दयाबेनला या मालिकेत निर्मात्यांना पुन्हा आणायचे आहे.

First Published on: September 28, 2020 6:14 PM
Exit mobile version