फिल्म ‘तडप’चा टीझर प्रदर्शित

फिल्म ‘तडप’चा टीझर प्रदर्शित

फिल्म 'तडप'चा टिझर प्रदर्शित

फॉक्स स्टार स्टूडियोजची प्रस्तुती आणि सह-निर्मिती असलेला, साजिद नाडियाडवाला यांचा ‘तड़प’ निश्चितच या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. जेव्हापासून चित्रपटाच्या निर्मात्यांनी या अनोख्या प्रेमगाथेच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे, तेव्हापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि उत्साह सळसळला आहे. याच उत्सुकतेला थोडे अधिक ताणत निर्मात्यांनी आज या रोमांटिक एक्शन ड्रामाच्या टीजरचे अनावरण केले आहे जो रॉ, इंटेंस, पैशनेट आणि अपलिफ्टिंग संगीतमय आहे. मिलन लुथरिया यांच्याद्वारे दिग्दर्शित, अहान शेट्टी आणि तारा सुतारिया अभिनीत ‘तड़प’च्या या टीजरमध्ये या दोन युवा स्टार्समध्ये एक सुंदर एलेक्टरीफाइंग केमिस्ट्री पहायला मिळत आहे.

या प्रभावी टीझरमध्ये, आपल्याला अनुक्रमे अहान आणि तारा यांनी रंगवलेल्या इशान आणि रमिसा यांच्या जगाची झलक मिळणार आहे. त्यांच्या व्यक्तिरेखांना उत्तम प्रकारे स्थापित करण्यात आले असून त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढत आहे. सुंदर रामिसा हिमाच्छादित पर्वतांच्या नयनरम्य ठिकाणी दिसत आहे, तर इशाना तिच्या बाइकसह मर्दानी अवतारात दिसत आहे. अहान त्याच्या शर्टलेस अवतारात डॅशिंग दिसत आहे, आणि तारा खूपच सुंदर दिसत आहे.

विशेष म्हणजे अहान आणि तारा या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर टीझर पोस्ट केला असून चाहत्यांसाठी हा सुखद धक्का आहे. अहान शेट्टीच्या मोठ्या बॉलीवूड पदार्पणासोबतच, हा तेलगू ब्लॉकबस्टर RX 100 चा अधिकृत हिंदी रिमेक असून थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला मोठा रोमँटिक ड्रामा आहे.

फॉक्स स्टार स्टूडियोजद्वारे प्रस्तुत आणि सह-निर्मित, नाडियाडवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंट प्रोडक्शनच्या ‘तडप’ची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली असून मिलन लुथरिया यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपट ३ डिसेंबर २०२१ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.


हेही वाचा –  भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरेचा ‘अजिंक्य’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

First Published on: October 26, 2021 8:27 PM
Exit mobile version