#Me Too: ‘नाना पाटेकर निर्दोष नाहीत’

#Me Too: ‘नाना पाटेकर निर्दोष नाहीत’

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात विनयभंगाचा आरोप केला होता. पण या प्रकरणात नाना पाटेकर यांना दिलासा मिळाला आहे. तनुश्रीने नाना यांच्या विरोधात केलेल्या आरोपांचे पुरावे नाहीत, असा अहवाल ओशिवरा पोलिसांनी न्यायालयात दाखल केला आहे.नाना यांच्या विरोधात केलेल्या आरोपांचे पुरावे नाहीत, असा अहवाल ओशिवरा पोलिसांनी न्यायालयात दाखल केला असला तरी तनुश्रीने या अहवालात काही तथ्य नसल्याचे म्हटलं आहे. भ्रष्ट पोलिसांनी भ्रष्ट माणसाबद्दल दिलेला हा अहवाला आहे. नानांनी केवळ माझ्याबाबतच गैरवर्तवणूक नाही तर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना ही वागणूक दिली आहे.

‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी विनयभंग केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. तनुश्रीने नाना पाटेकरांच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीनंतर पुन्हा एकदा #Me Too मोहिमेला सुरूवात झाली. या प्रकरणात काही बॉलिवूडकरांनी तुनश्रीची बाजू घेतली तर काहींनी नाना पाटेकरांना पाठिंबा दिला.

 

नेमकं काय घडलं चित्रीकरणादरम्यान

२००८मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण सुरू होते. या चित्रीकरणादरम्यान तनुश्रीला नाना यांनी चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला असे सांगत चित्रीकरण थांबवले. त्यानंतर पुढील चित्रीकरणास तीने नकार दिला. त्यानंतर राखी सावंतने हे गाणं चित्रपटासाठी केले. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले होते. तर राकेश सारंग चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सुमारे दहा वर्षांनी तिने या प्रकरणाला #MeToo प्रकरणात वाचा फोडली. २००८ मध्ये हा वाद निर्माण झाल्यानंतर तनुश्री दत्ताने हा सिनेमा सोडला. तसंच ती परदेशात वास्तव्यास निघून गेली. गेल्या वर्षी तिने भारतात परतल्यावर अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

तनुश्रीने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती एफआयआरही नोंदवला होता. तनुश्रीने नानांसह नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्दिकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधातही ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, तनुश्रीने केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचा अहवाल पोलिसांनी दाखल केल्यामुळे नाना यांना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

First Published on: June 13, 2019 5:25 PM
Exit mobile version