तनुश्री लेस्बियन, बलात्कार केल्याचा राखी सावंतचा आरोप

तनुश्री लेस्बियन, बलात्कार केल्याचा राखी सावंतचा आरोप

अभिनेत्री तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर बर्‍याच जणींनी या मीटू मध्ये उडी घेतली. यानंतर रोज नवनवीन नाव लोकांसमोर अजूनही येत आहे. मात्र आता या प्रकरणाला पुन्हा एकदा नवीन वळण लागलं असून राखी सावंतने पत्रकार परिषद घेऊन तनुश्री लेस्बियन असून आपल्यावर तिने बलात्कार केल्याचा आरोप राखीने केला आहे. राखीने केलेल्या मानहानीबद्दल तनुश्रीने तिच्यावर १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला होता. मात्र त्याउलट आपण योग्य असून आपणच तनुश्रीवर ५० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं राखी सावंतनं सांगितलं.

परिषदेत दिसली सोज्वळ राखी

आपण फारच सभ्य आणि सोज्वळ असल्याचे भासवत राखी सावंतने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये अगदी डोक्यावर साडीचा पदर घेत राखीने आता तनुश्रीवर नवीन आरोप केले आहेत. १२ वर्षांपूर्वी तनुश्री माझी अगदी जवळची मैत्रीण होती त्यामुळे मी तिच्याबरोबर बर्‍याच रेव्ह पार्टीमध्ये गेले असून तनुश्री ही मुलगी नसून ती मनातून मुलगा असल्याचं आणि लेस्बियन असल्याचं राखीनं यावेळी सांगितलं. इतकंच नाही तर रेव्ह पार्टीमध्ये तनुश्री ड्रग्ज घेत होती आणि त्यावेळी तिने बर्‍याचदा आपल्या गुप्तांगांनाही हात लावल्याचा आरोप यावेळी राखीने केला.

या घटनेचे आहेत दोन साक्षीदार

हे सर्व सांगून राखी सावंत थांबली नाही तर पुढे या घटनेचे दोन साक्षीदारही आपल्याकडे असल्याचं तिनं सांगितलं आहे. मात्र या साक्षीदारांचं नाव सध्या घेणार नसून त्यांना न्यायालयात हजर करणार असल्याचंही तिनं सांगितलं. इतकंच नाही तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओप्रमाणे आदमी बचाओ मोहीमदेखील सुरु करावी अशी विनंती यावेळी राखीने केली आहे.

First Published on: October 24, 2018 9:07 PM
Exit mobile version