Sushant Sucide Case : बिहार पोलिसांकडून अंकिताची एक तास चौकशी!

Sushant Sucide Case : बिहार पोलिसांकडून अंकिताची एक तास चौकशी!

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी बिहार पोलिसांनी अंकिता लोखंडेची सुमारे तासभर चौकशी केली. काही वेळापूर्वीच बिहार पोलीस अंकिता लोखंडेच्या घरी पोहचले होते. यावेळी त्यांनी अंकिताची सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी चौकशी करण्यात आली. मात्र या चौकशीतून नेमकं काय समोर आलं आहे हे अद्याप समजलेलं नाहीये. काही वेळापूर्वीच त्यांनी अंकिता लोखंडचं निवासस्थान सोडलं. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

 रियाविरोधात माहिती दिल्याची शक्यता

सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात पाटणा येथे पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर सुशांतची पूर्व प्रेयसी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने Truth Win म्हणजेच सत्याचा विजय, असे ट्विट केले होतं. त्यानंतर रिया सुशांतचा मानसिक छळ करते अशा आशयाचे सुशांतने अंकिता मेसेज केल्याचेही तीने मुंबई पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे आजही अंकिताने बिहार पोलिसांना याबाबत माहिती दिल्याची शक्यता नाकारता येत नाही.

First Published on: July 30, 2020 11:42 PM
Exit mobile version