‘वॉर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘वॉर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सौजन्य यशराज फिल्म

यशराज फिल्म निर्मित ‘वॉर’ या चित्रपटचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ ही नवी धमाकेदार जोडी दिसली असून पहिल्यांदाच या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे बॉलिवूडचे अॅक्शन हिरो म्हणून ओळखले जातात. हे अॅक्शन हिरो ‘वॉर’ या चित्रपटातून दिसणार आहे. ‘वॉर’ या चित्रपटाचा टीझर खूपच धमाकेदार आहे.

दिग्दर्शिक सिद्धार्थ आनंद याच्या ‘वॉर’ या चित्रपटात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अॅक्शन सीन आहेत. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म यांनी केली आहे. टीझरच्या काही सीनमध्ये टायगर हा हृतिकचा पाठलाग करताना दिसत आहे. फॉरेन लोकेशन, ड्रामा आणि भरपूर अॅक्शन असल्यामुळे या टीझरने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या टीझरमध्ये एकमेकांच्या वरचढ दिसत आहे.

टायगरला हृतिकसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे तो खूप खूश आहे. त्याला हृतिकसोबत काम करण्याची संधी गमवायची नव्हती, असे टायगर म्हणाला आहे. हा चित्रपट गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

First Published on: July 15, 2019 3:34 PM
Exit mobile version