VIDEO – तेजश्री प्रधानचा हिंदी चित्रपटाचा पहिला किसिंग सीन

VIDEO – तेजश्री प्रधानचा हिंदी चित्रपटाचा पहिला किसिंग सीन

तेजश्री प्रधानचा हिंदी चित्रपटाचा पहिला किसिंग सीन

झी मराठी या वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचणारी अभिनेत्री म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री तेजश्री प्रधान. हिने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. छोट्या आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसेच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने आपली छाप सोडली आहे. विशेष म्हणजे अभिनेता शर्मन जोशीसोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘बबलू बॅचलर’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तेजश्री प्रधानचा हिंदी चित्रपटाचा पहिला किसिंग सीन तिच्या चाहत्यांना पाहता येणार आहे.

लिपलॉक सीन

तेजश्रीने आपल्या पहिल्याच हिंदी सिनेमात लिपलॉक सीन दिला आहे. आता तिचा हा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना कितपत आवडतो हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कळणार आहे. दरम्यान, स्वतः तेजश्रीने तिच्या सिनेमाचे पहिले पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले असून तेजश्रीच्या चाहत्यांनीही तिच्या नवीन प्रवासासाठी तिला भरभरून शुभेच्छा देखील दिल्या.

होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेत तेजश्रीनं जान्हवी नावाच्या सोशिक आणि समंजस तरुणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती. या मालिकेसाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय, महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या सूर नवा ध्यास नवा या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालनही तिने केले होते.


हेही वाचा – तेजश्री प्रधान बॉलिवूडमध्ये एन्ट्री ‘या’ अभिनेत्याबरोबर स्क्रीन शेअर करणार


First Published on: February 11, 2020 2:26 PM
Exit mobile version