तेजश्री म्हणजे प्लीज नो सेल्फी

तेजश्री म्हणजे प्लीज नो सेल्फी

Tejashree Pradhan

मालिकेत दिसणारे कलाकार प्रत्यक्ष भेटावेत, त्यांच्याबरोबर सुसंवाद साधता यावा इतकेच काय तर आताच्या जीवनशैलीप्रमाणे एखादा सेल्फीही टिपता यावा, असे या प्रेक्षकांना वाटत असते. छोट्या पडद्यावरचे लोकप्रिय कलाकार या ना त्या कारणाने वेगवेगळ्या कार्यक्रमांना जात असले तरी प्रेक्षकांना इथे त्यांना भेटता येईलच याची खात्री देता येत नाही. मग जागरुक आणि कलाकारांचा चाहता असलेला प्रेक्षक नाटकाला जाऊन आपल्या आवडत्या कलाकाराला गाठत असतो. होणार सून मी या घरची या मालिकेतली जान्हवी म्हणजे तेजश्री प्रधान तुम्हाला आठवत असेलच. चित्रपटाबरोबर आता ती नाटकातही काम करते आहे. दोन तास एखाद्या भूमिकेशी एकरूप झाल्यानंतर भेटायला येणारा प्रेक्षक त्याविषयी फारसे काही बोलत नाही. एखाद्या सेल्फीसाठी प्रेक्षकाचा हा सगळा खटाटोप आहे का असे तिला वाटायला लागलेले आहे. संजय मोने यांच्या कानाला खडा या चॅट शोमध्ये तिने आपली खंत व्यक्त केलेली आहे. प्लीज नो सेल्फी असेही कधीतरी म्हणावेसे वाटते. शिवाय बरच काही ती बोललेली आहे. आज शनिवारी रात्री झी- मराठीच्या कार्यक्रमात पाहता येईल.

First Published on: March 30, 2019 4:06 AM
Exit mobile version