Shweta Tiwari Controversy : ‘ब्रा आणि भगवान’ या वादग्रस्त वक्तव्यावर श्वेता तिवारीने मगितली माफी

Shweta Tiwari Controversy : ‘ब्रा आणि भगवान’ या वादग्रस्त वक्तव्यावर श्वेता तिवारीने मगितली माफी

Shweta Tiwari Controversy : ‘ब्रा आणि भगवान’ या वादग्रस्त वक्तव्यावर श्वेता तिवारीने मगितली माफी

हिंदी टेलिव्हिजन आणि बिग बॉस ४ ची विजेती श्वेता तिवारी तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चत होती. ती एका वेबसीरीजच्या प्रमोशनच्यावेळी भोपाळमध्ये गेली असता, एका मुलाखतीत प्रश्नांची उत्तरे देताना तिची जीभ घसरली आणि त्यावेळेस तिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन तिला ट्रोल केले जात होते. मात्र, आता अभिनेत्री श्वेता तिवारीने या प्रकरणाबाबत माफी मागितली आहे. वाढत्या वादामुळे अभिनेत्री श्वेता तिवारीने एक सोशल मिडियावर पोस्ट करत माफी मागितली आहे. श्वेता तिवारीने सांगितले की, माझा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. श्वेताने आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागितली आहे. अभिनेत्रीचे म्हणणे आहे की, माझ्या विधानाला चुकीचे समजले जात आहे. त्या वाक्याला वेगवेगळे वळण दिले जात आहे. माझा स्वत:चा देवावर खूप विश्वास आहे. मग मी असं का करेन, असे श्वेता तिवारीने स्पष्टीकरण दिले आहे.

 

श्वेता तिवारीने माफीनाम्यात लिहिले आहे की, मला माहित झाले की माझ्या सहकाऱ्याच्या मागील भुमिका लक्षात घेऊन माझ्या विधानाचीही गैर समजूत केली जात आहे. जेव्हा या गोष्टीला संदर्भात ठेवले तर, ‘भगवान’ चा रेफरंसमध्ये करण्यात आलेले विधान सौरभ राज जैन याच्या देवताच्या भुमिकेसंदर्भात होते. लोक अनेकदा पात्रांची नावे अभिनेत्यांशी जोडतात. तथापि संपूर्ण विधानामागे अनेकांनी चुकीचा गैरसमज करुन घेतला आहे.

काय आहे प्रकरण?

श्वेता तिवारी तिच्या आगामी वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी भोपाळमध्ये गेली होती. यावेळी वेबसिरीजची संपूर्ण टीम त्याठिकाणी उपस्थित होती. त्यावेळी मुलाखतीत गमतीशीर प्रश्नांची उत्तरे देताना श्वेताने ‘मेरी ब्रा का साइज भगवान भी ले रहे है!’, असे वक्तव्य केले. हे वक्तव्य श्वेताने गंमतीत केलेले असले तरी यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी श्वेता तिवारीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.


हे ही वाचा – ‘ब्रा’ वरील वादग्रस्त वक्तव्यानंतर Shweta Tiwari म्हणतेय Kiss My…, व्हिडीओ व्हायरल


 

First Published on: January 28, 2022 5:20 PM
Exit mobile version