मालिकेच्या सेटवर अभिनेत्रीला कोरोनाची लागण, क्रू मेंबर्सचीही होणार चाचणी!

मालिकेच्या सेटवर अभिनेत्रीला कोरोनाची लागण, क्रू मेंबर्सचीही होणार चाचणी!

कोरोना आणि त्यामुळे देशभरात असलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपट, मालिकांचे शुटींग बंद होतं. मात्र आता तब्बल तीन महिन्यांनंतर मालिकांच्या शुटींगला सुरूवात झाली आहे. या दरम्यान कोरोना आणि लॉकडाऊनचे नियम पाळूनच निर्मात्यांना शुटींग करणं भाग आहे. मात्र यामुळे निर्मात्यांची डोकेदुखी वाढणार आहे. कारण शुटींग दरम्यान अभिनेत्रीला कोरोनाची लागण झाली आहे. जवळपास तीन महिने सर्व शूटिंग बंद होतं. मात्र आता नियमावली आखत शूटिंगला सुरुवात करण्यात आली. तरीसुद्धा करोनाचा धोका हा कायम आहे. त्यामुळे आता मनोरंजन सृष्टीसमोर हे एक नवं आव्हान आहे.

प्रसिद्ध तेलुगू अभिनेत्री नव्या स्वामीची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मालिकेचं शूटिंग ताबडतोब थांबवण्यात आलं आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून तिला डोकेदुखीचा त्रास होत होता. डॉक्टरांनी कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिल्यानंतर तिने ती चाचणी केली आणि तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर तिला क्वारंटाइन करण्यात आलं. आता मालिकेतील इतर कलाकार व क्रू मेंबर्स यांचीही चाचणी करण्यात येणार आहे.

“काल रात्री घरी गेल्यानंतर आणि सकाळीही मी खूप रडत होते. माझी आईसुद्धा रडत आहे. मला अनेकांचे मेसेज येत आहेत. हे सगळं खूप त्रासदायक आहे. माझ्यामुळे माझे सहकलाकार आणि क्रू मेंबर्स यांचेही प्राण धोक्यात घातल्यामुळे मला अपराधी असल्यासारखं वाटतंय.” असं  नव्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.


हे ही वाचा – गुंगीचं औषध पाजून महिलेवर चौघांनी केले अत्याचार!


First Published on: July 5, 2020 12:47 PM
Exit mobile version