‘लगीन घाई’ टकटक २ चित्रपटातलं भन्नाट गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘लगीन घाई’ टकटक २ चित्रपटातलं भन्नाट गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी सिने सृष्टीत आणखी एक भन्नाट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘टकाटक २'(takatak 2) हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर, टिझर आणि टायटल साँग पारदर्शित झाल्यांनतर सर्वत्रच ‘टकाटक २’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या हसतच ‘टकाटक २’ चित्रपटतलं ‘लगीन घाई’ हे गाणं सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तरुणाईसोबतच सर्वच वयोगटातील रसिकांना भावणारं आणि चित्रपटाच्या कथेशी एकरूप होणारं असं हे गाणं सोशल मीडियावर चांगलचं गाजतं आहे. हे गाणं प्रदर्शित होताच या गाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. १८ ऑगस्ट २०२२ रोजी ‘टकाटक २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हे  ही वाचा – ‘सेलिब्रिटी श्रावण पाळत नाहीत का?’ नेटकऱ्यांचा श्रेया बुगडेला प्रश्न; पाहा अभिनेत्रीचे गोवा व्हेकेशन फोटो

‘टकाटक २’च्या टायटल साँगनंतर ‘लगीन घाई’ हे आणखी एक धमाल साँग रसिकांच्या भेटीला आलं आहे. लेखक-दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘टकाटक २’मधील हे गाणं कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणारं आहे. गीतकार जय अत्रे यांनी कथा आणि चित्रपटाचा जॅानर ओळखून ‘लगीन घाई'(lagin ghai) हे गाणं लिहिलं आहे. आनंद शिंदे आणि कविता राम यांनी हे गाणं गायलं असून, संगीतकार वरुण लिखते यांनी संगीतबद्ध केलं आहे.

या गाण्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा मिलिंद कवडे, जय अत्रे, आनंद शिंदे आणि वरुण लिखते या चौकडीच्या संगीताची केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. यापूर्वी या चौकडीनं केलेली गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली आहेत. त्यामुळं ‘लगीन घाई’ हे गाणंही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल याची ‘टकाटक २’च्या(takatak 2) टिमला खात्री आहे. या गाण्याबाबत आनंद शिंदे म्हणाले की, मिलिंद कवडे यांनी रसिकांची नाडी ओळखली आहे. त्यांना काय हवं ते त्यांना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळं त्यांच्या चित्रपटातील गाणी रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होतात. ‘लगीन घाई’ हे गाणं माझ्या शैलीतील असून ते माझ्या नेहमीच्या अंदाजात गायलं आहे. गाणं रेकॅार्ड करताना खूप मजा आली. जय अत्रे यांनी लिहिलेल्या शब्दांना वरुण लिखते यांनी सुमधूर संगीताच्या माध्यमातून अचूक न्याय देण्याचं काम केलं आहे. हे गाण सर्व प्रकारचं संगीत ऐकणाऱ्या रसिकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होईल अशी आशाही शिंदे यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा – बाप्पासोबत खास फोटो: चिमुकल्या परीचा मराठमोळा साज; तिलाही लागलीय गणेशोत्सवाची आस

या चित्रपटात प्रथमेश परब, अजिंक्य राऊत9ajinkya raut), अक्षय केळकर, प्रणाली भालेराव, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकार झळकणार आहेत. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनीच ‘टकाटक २’ची कथा-पटकथा लिहिली आहे. लेखक किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी संवादलेखनाचं काम केलं आहे. डिओपी हजरत शेख वली यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी नजर खिळवून ठेवणारी असून, अभिनय जगताप यांनी दिलेलं पार्श्वसंगीत प्रसंगांमधील प्रभाव वाढवणारं आहे. निलेश गुंडाळे यांनी या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

 

First Published on: August 2, 2022 12:56 PM
Exit mobile version