आज सोनपावलांनी येणाऱ्या माहेरवाशीण गौराईंचे आगमन

आज सोनपावलांनी येणाऱ्या माहेरवाशीण गौराईंचे आगमन

लाडक्या गणरायांच्या पाठोपाठ गौरींच्या स्वागताची जय्यत तयारी घरोघरी सुरू झाली आहे. गरुवारी ५ सप्टेंबरला जेष्ठा गौरींचे आगमन होत आहे. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर गौराईंचे आज आगमन तिसऱ्या दिवशी होत आहे. त्यामुळे गौराईच्या स्वागताकरिता आठ दिवसांपासून सुरू असलेली महिलांची तयारी जोरदार सुरू आहे.


हेहा वाचा- लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांची अजब पत्रं


सकाळी ६.२१ पासून मुहूर्त असून रात्रीपर्यंत सोनपावलांनी येणाऱ्या माहेरवाशीण गौराईंचे आज आगमन होणार आहे. गणेशोत्सवात महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा, सखी-पार्वती अशा जोडीने त्यांना घरात आणण्याची परंपरा असते.

गौरी स्थापनेचे शुभ मुहूर्त

सकाळी ६.२१ मिनीटे ते ७.५४, ११ ते १२.३३, १२.३३ ते १४.०७, १४.०७ ते १५.४०, १७.१३ ते १८.४६, १८.४६ ते २०.१३, २०.१३ ते २१.४० हे शुभ मूहूर्त आहेत.

या शुभ मुहूर्तावर सोनपावलांनी येणाऱ्या गौरींचे आज उत्साहात आगमन होणार आहेत. तर उद्या त्यांचे पूजन होणार असून परवा त्यांचे विसर्जन होणार आहे.

First Published on: September 5, 2019 9:53 AM
Exit mobile version