‘भेडिया’ चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलरची प्रेक्षकांना भुरळ

‘भेडिया’ चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलरची प्रेक्षकांना भुरळ

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री कृति सेननचा आगामी ‘भेडिया’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिकने केलं असून चित्रपटात वरुण धवनने लांडगा बनून लोकांना घाबरवताना दिसत आहे. तर कृति सेनन या चित्रपटामध्ये डॉक्टर अनिका ही भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा नुकताच प्रर्दशित करण्यात आलेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी पणाला लागली आहे.

या ट्रेलरमध्ये वरुण धवनला जंगलातील एक लांडगा चावतो. ज्यानंतर तो त्याच प्राण्यासारखा वागू लागतो आणि लोकांना घाबरवतो. तसेच यामध्ये अनेक विनोद देखील पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अनेकजण या ट्रेलरचं कौतुक करत आहेत आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

या दिवशी होणार प्रदर्शित

अमर कौशिक दिग्दर्शित भेडिया चित्रपट येत्या 25 ओक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भेडिया हा सिनेमा ‘कॉमेडी हॉरर सिनेमा’ आहे. सिनेमाचे शुटींग हे अरुणाचल प्रदेशच्या घनदाट जंगलात करण्यात आले आहे. खरंतर हा सिनेमा 2020 पूर्वीच रिलीज होणार होता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा फार लांबणीवर पडला. सिनेमात मोठ्या प्रमाणात विएफेक्स इफेक्ट्स प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. वरुण धवल आणि कृती सेनन यांच्या व्यतिरिक्त सिनेमात अभिनेते अभिषेक बॅनर्जी आणि दीपक हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.


हेही वाचा :

इफ्फीसाठी निवडलेल्या ‘पल्याड’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित

First Published on: October 19, 2022 2:39 PM
Exit mobile version