या यूट्यूब चॅनल विरोधात आराध्या बच्चनची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

या यूट्यूब चॅनल विरोधात आराध्या बच्चनची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

मुंबई | बॉलिवूडचे बिग बी अभिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात आणि ऐश्वर्या-अभिषेक यांची मुलगी आराध्या बच्चन तिच्याबद्दल अनेकदा सोशल मिडियावर चर्चा रंगतात. आराध्या ही नेहमी तिची आई ऐश्वर्यासोबत बऱ्याच कार्यक्रमात दिसून येते. आराध्याला सोशल मिडियावर तिच्या लूकमुळे देखील ट्रोल केले जाते. पण, आता आराध्याच्या आरोग्याविषयी खोट्या बातम्या (Fake News) चालविल्या होत्या. या प्रकरणी बच्चन कुटुंबियांनी यूट्यूब टॅब्लॉइडच्या (YouTube tabloid)  विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेतली आहे. या प्रकरणावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

बच्चन कुटुंबियांनी त्यांच्या याचिकेत म्हटले, “यूट्यूब टॅब्लॉइडने आराध्याच्या आरोग्याबाबत खोट्या बातम्या दिल्या. त्या यूट्यूब टॅब्लॉइड विरोधात कारवाई करण्यात यावी. आणि आराध्याबाबत व्हायरल होणाऱ्या बातम्या थांबविण्यात यावे. कारण, आराध्या ही अल्पवयीन आहे.” या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश सी हरीशंकर यांच्यासमोर आज सुनावणी होणार आहे.

दरम्यान, नुकतेच जिओ वर्ल्ड गार्डन्स येथे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या भव्य उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आराध्या तिची आई ऐश्वर्यासोबत दिसली होती. आराध्याचा जन्म हा १६ नोव्हेंबर २०११ ला झाला. आराध्या बच्चन ही मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आराध्याचा कविता म्हणतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

 

First Published on: April 20, 2023 10:08 AM
Exit mobile version