२०२० : मोस्ट पॉप्युलर Tweet’s

२०२० : मोस्ट पॉप्युलर Tweet’s

२०२०मधील मोस्ट पॉप्युलर ट्विट्स

२०२० हे वर्ष कोरोना महामारीच्या संकटात गेले. या काळात सर्वात सोशल मीडियाचा सर्वात जास्त वापर करण्यात आला. वॉट्स अप, इन्टाग्राम, ट्विटरवर पॉझिटिव्ह राहण्यासाठी भारतीयांना उपयोगी माहिती मिळाली. त्याचबरोबर भारतीयांचे मनोरंजनही झाले. या काळात ट्विटर हे सर्वाधिक लोकप्रिय ठरले. संपूर्ण जगाने जागतिक महामारीचा सामना करताना माहिती मिळवण्यासाठी तसेच कनेक्टेड राहण्यासाठी आणि मनोरंजनासाठी ट्विटरचा आधार घेतला. कृतज्ञता किंवा आभार व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात डॉक्टर आणि शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. अनेकांनी माहिती देण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी ट्विटचा वापर केला. त्यातील काही ट्विट्स अजूनही बऱ्याच जणांच्या लक्षात असतीस. पाहूयात २०२०मधील काही पॉप्युलर ट्विट्स.

तमिळ अभिनेता विजय याचे सेफ्ली 

तमिळ अभिनेता विजय याचा चाहत्यांसोबत काढलेला सेल्फी अत्यंत लोकप्रिय ठरला. विजयचा हा सेल्फी मोस्ट रिट्विट ऑफ इअर ठरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरामध्ये दिवे प्रज्वलित करण्यातचे आवाहन केले होते. मोदींचे हे ट्विट मोस्ट रिट्विट बास पॉलिटिशियन ठरवला आहे.

क्रिकेटर महेद्र सिंह धोनी

भारतीय क्रिकेटर महेद्र सिंह धोनी यानी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ट्विटरवर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक पत्र लिहिले होते. या पत्रातून धोनीने पंतप्रधानांचे आभार मानले होते. या ट्विटचे देशभरातील क्रिडा प्रेमींनी ट्विटचे कौतुक केले होते. हे ट्विट मोस्ट रिट्विटेड ट्विट बाय एनएथलीट ठरला आहे.

रतन टाटा

उद्योजक आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी कोरोना महामारीत ५०० कोटींचे योगदान देण्याची घोषणा केली. या उपक्रमाचे भारतभर कौतुक करण्याते आले.

विराट कोहली

बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही प्रेग्नंट असल्याची बातमीचे ट्विट करण्यात आले होते. अनुष्का शर्मा प्रेग्नंट असल्याचे विराट कोहलीचे ट्विट मोस्ट लाइक ट्विट ऑफ२०२० म्हणून ठरले आहे. अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीची बातमी सांगणारे हे ट्विट वर्षांतील मोस्ट ५ लाइक ट्विटमध्ये आहे.

अमिताभ बच्चन

अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी कोरोना विषाणूबाबत जनजागृती करणारे आणि आजार झाल्यास काळजी घेण्याबाबतचे ट्विट अमिताभ यांचे ट्विट हे मोस्ट कोटेड ट्विट ऑफ २०२० ठरले आहे.

First Published on: December 8, 2020 9:03 PM
Exit mobile version