‘महाभारत’ चित्रपटात शाहिद कपूरची वर्णी साकारणार ही भूमिका

‘महाभारत’ चित्रपटात शाहिद कपूरची वर्णी साकारणार ही भूमिका

'महाभारत' चित्रपटात शाहिद कपूरची वर्णी साकारणार ही भूमिका

अभिनेता शाहिद कपूरच शेड्यूल सध्या खूप व्यस्त असल्याचे दिसतेय.आणि अशातच आता आणखीन एका चित्रपटात त्याची वर्णी लागली असल्याची माहिती समोर आली आहे. ‘महाभारत’ या आगामी बहुचर्चित चित्रपटात शाहिद कपूरची एंट्री झाली असल्याची  चर्चा सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश यांच्या दिग्दर्शना अंतर्गत बनणारा आगामी बहुचर्चित मायथोलॉजिकल ड्रामा ‘महाभारत’ चित्रपटामध्ये शाहिद कपूर ‘सूर्यपुत्र कर्णाची’ भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शाहिदला चित्रपटाची स्क्रिप्ट सुद्धा पसंत असल्याचे बोलले जात आहे. शाहिदला चित्रपटासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. इतकेच नाही तर शाहिदला ‘कर्ण’ भूमिका साकारण्यासाठी संपूर्ण बॉडी ट्रान्सफ्रॉम करून ‘कर्णच्या लूक साठी तयार केले जाणार आहे.

सध्या शाहिद कपूरच्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. जर्सी सिनेमा हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असून एका प्रतिभावान पण अयशस्वी क्रिकेटपट्टू जो भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची आणि भेटवस्तू म्हणून मुलाच्या जर्सीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या वयाच्या चाळीसी मध्ये क्रिकेटमध्ये परतण्याचा निर्णय घेतो. अशी कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. तसेच हिंदी चित्रपटाच्या रिमेक मध्ये शाहीद मुख्य भूमिका साकारणार आहे. लवकरच शाहिद दिग्दर्शक राज अँड डिकेच्या वेब सिरिज मधून ओटीटी वर प्रदार्पण करणार आहे. तसेच महाभारत हा चित्रपट २०२३ ला प्रदर्शित होऊ शकतो असे संकेत निर्मात्यांन तर्फे देण्यात आले आहे.


हे हि वाचा – नवाझुद्दीन सिद्दीकी गायनातही आजमावणार नशीब

First Published on: April 20, 2021 6:17 PM
Exit mobile version