विशाल भारद्वाज आणि लव रंजन यांचा बहुप्रतिक्षित आगामी चित्रपट ‘कुत्ते’ जानेवारीत प्रदर्शित होणार असून प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच, चित्रपटाच्या ट्रेलरसह सर्व कलाकारांच्या रफ आणि रस्टी लुकची झलक दिल्यानंतर, निर्माते आता ‘फिर धन ते नान’ गाणे लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. तसेच, या गाण्याचे उत्कृष्ट संगीत पुन्हा एकदा प्रेक्षकांना आकर्षित करेल.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लव रंजनने गाणे रिलीज करण्याची घोषणा केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले
Ye new year hoga #PhirDhanTeNan taiyaar hojao! 🪩🕺
Song coming out soon, stay tuned! 🥰#Kuttey in cinemas 13th January@arjunk26 #Tabu #NaseeruddinShah @konkonas #KumudMishra #RadhikaMadan #ShardulBhardwaj @VishalBhardwaj #Gulzar @Sukhwindermusic @VishalDadlani @vijayganguly pic.twitter.com/n1xxl3eT69
— Luv Films (@LuvFilms) January 3, 2023
अलीकडेच, निर्मात्यांनी ‘कुत्ते’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला असून, या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आसमान भारद्वाज दिग्दर्शित, अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, कुमुद मिश्रा, राधिका मदन, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. तसेच, आसमान आणि विशाल भारद्वाजद्वारा लिखित ‘कुत्ते’या चित्रपटातून आसमान भारद्वाज दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.
हेही वाचा – ‘अवतार 2’ने जगभरात कमावले ‘इतके’ कोटी ‘टायटॅनिक’ आणि ‘अवतार 1’लाही टाकलं मागे
लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मित, ‘कुत्ते’हा चित्रपट गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारा प्रस्तुत आहे. तसेच, या चित्रपटाला संगीत विशाल भारद्वाज देणार असून गुलजार यांनी गीते लिहिली आहेत. ‘कुत्ते’हा चित्रपट 13 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.