‘उलगडणार धर्मवीरची पडद्यामागची कहाणी’

‘उलगडणार धर्मवीरची पडद्यामागची कहाणी’

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रसिद्ध नाव आणि ठाण्याचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेले धर्मवीर आनंद दिघे (dharmaveer anand dighe) यांच्या जीवनावर आधारित धर्माची मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपट अभिनेता प्रसाद (prasad oak) ओकने आनंद दिघेंची (anand dighe) मुख्य भूमिका साकारली आहे.  तर प्रवीण तरडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचे जे प्रेम मिळालं आणि तो प्रतिसाद मिळाला त्याच्यात गाथा आता प्रेक्षकांना टि. व्ही वर पाहायला मिळाणार आहे.

धर्मवीर चित्रपटाला जे यश मिळाले त्याचीच यशोगाथा (yashogatha) प्रेक्षकांना येत्या रविवारी म्हणजेच १९ जून रोजी पाहायला मिळणार आहे. झी टॉकीज ( zee talkies) या वाहिनीवर दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता धर्मवीर चित्रपटाची पडद्यामागची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. धर्मवीर चित्रपटाला मिळालेल्या यशाला सलाम करण्या करीता या चित्रपटाची यशोगाथा तयार करण्यात आली आहे. या चित्रपटाचा आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास आणि अनुभव या यशोगाथेमध्ये कथन करण्यात आले आहेत. त्याच बरोबर कलाकार आणि इत्तर तंत्रज्ञ मंडळी यांचे चित्रपटादरम्यानचे अनुभव आणि पडद्यामागचे काही महत्वाचे क्षण आणि किस्से या सगळ्याचा समावेश या यशोगाथेमध्ये करण्यात आले आहेत.

या चित्रपटात आनंद दिघे ( anand dighe) यांची मुख्य भूमिका अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) याने केली आहे, या भूमिकेसाठी प्रसाद ओकचं सगळीकडूनच कौतुक करण्यात आले होते. प्रसाद ओक कोणत्याही कार्यक्रमात किंवा माध्यमांशी धर्मवीर या चित्रपटाविषयी, भूमिकेविषयी आणि आनंद दिघे यांच्या विषयी नेहमीच भरभरून बोलतात. दरम्यान धर्मवीर चित्रपटाची जी यशोगाथा १९ जून रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या संदर्भात बोलताना अभिनेता प्रसाद ओक म्हणाला की, मराठी चित्रपटांच्या यशाचा मापदंड म्हणून धर्मवीर या चित्रपटाकडे पाहिलं जाईल असं प्रसाद ओकने ( prasad oak) आवर्जून नमूद केले. आभाळाएवढे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व असलेले हे लोकनेते सर्वसामान्यांच्या मनात आजही जिवंत आहेत. मला आणि माझ्या भूमिकेला मिळालेलं प्रेम ही त्याचीच पोचपावती आहे.

धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेता प्रसाद ओक या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ठीक ठिकाणी मुलाखत देत असताना एका मुलाखती दरम्यान प्रसादने एक किस्सा सांगितला त्यात प्रसाद असं म्हणाला की चित्रपटाच्या चित्रीकरण सुरु होण्याच्या एक दिवस आधी मला या भूमिकेचे डोळे सापडले आणि आनंद दिघे ( anand dighe) यांची भूमिका पडद्यावर साकारण्यासाठी बळ मिळालं

 

 

 

 

 

 

 

First Published on: June 15, 2022 9:31 PM
Exit mobile version