ठग्स.. चे पैसे परत द्या, चित्रपटगृहांची मागणी

ठग्स.. चे पैसे परत द्या, चित्रपटगृहांची मागणी

ठग्स फ्लॉप गेल्यामुळे थिएटर मालकांनी मागितला रिफंड

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमाकडून अपेक्षा असणाऱ्या अनेकांचा एका क्षणात अपेक्षाभंग झाला. अनेकांनी सिनेमा बघून झाल्यानंतर सिनेमा अगदीच टुकार असल्याच्या प्रतिक्रिया देखील दिल्या. त्यामुळे हा सिनेमा पहिल्याच आठवड्यात दणदणीत आपटला. इतक्या मोठ्या बॅनरखाली आलेल्या सिनेमामुळे अनेक ठिकाणी हा सिनेमा लावला खरा पण यात चित्रपटगृहांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा चित्रपटगृहांनी केला असून त्यांनी पैसे परत देण्याची मागणी चित्रपटाच्या निर्मात्याकडे अर्थात यशराज समुहाकडे केली आहे.

वाचा- ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’च्या तिकिटांचे दर वाढवल्याने आमिर नाराज

३०० कोटींचा सिनेमा कमाई १५० कोटी 

मोठा गाजावाजा करत या सिनेमाचा ट्रेलर आला. या सिनेमातील अॅक्शन सीन, मिस्टर परफेक्शनिस्ट आणि द बीग बी अमिताभ बच्चन यांमुळे हा सिनेमा एकदम ब्लॉगबस्टर असणार अशी खात्री सिनेमाच्या निर्मात्यांना होती. पण केवळ ११ दिवसात या सिनेमाने फक्त १५० कोटींची कमाई केली. रिलीज आधी प्री बुकींगमधून सिनेमाने ५२ कोटीचा गल्ला जमवल. त्यामुळे सिनेमागृहाने अधिक गुंतवणूक या सिनेमामध्ये केली. पण रिलीजनंतर सिनेमा चाललाच नाही. त्यामुळे केवळ थिएटर मालकांनी या सिनेमासाठी ५० टक्क्यांहून अधिक  केलेली गुंतवणूक मातीमोल ठरली आहे. त्यांना तब्बल ५० टक्के नुकसान झाल्याचे त्यांनी मिड- डेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

अन्यथा थिएटर्स बंद होतील

अमिताभ बच्चन, आमिर खान आणि कतरीना कैफ अशी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा चांगला नफा मिळवून देईल अशी अपेक्षा असताना हा सिनेमा न चालल्यामुळे आम्हाला नुकसान झाले आहे. हा सिनेमा दाखवण्यासाठी आम्ही जास्त पैसा लावला होता. पण आता या सिनेमानंतर काही थिएटर्स बंद होण्याची शक्यता असल्याचे देखील काही थिएटर चालकांनी सांगितले आहे. या आधी देखील शाहरुख खान, सलमान खान आणि रजनीकांत यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चालले नव्हते. त्यावेळीदेखील वितरकांना भरपाई देण्यात आली होती. ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘दिलवाले’, ‘ट्युबलाईट’ हे ते सिनेमे होते.

पाहा ठग्जचा ट्रेलर …

 

First Published on: November 20, 2018 6:21 PM
Exit mobile version