‘द कपिल शर्मा शो’ मधील ‘हे’ दोन कलाकार लवकरच अडकणार विवाहबंधनात!

‘द कपिल शर्मा शो’ मधील ‘हे’ दोन कलाकार लवकरच अडकणार विवाहबंधनात!

लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ मधील सर्वच कलाकारांना अल्पवधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या कार्यक्रमात पाहायला मिळालेला अभिनेता संकेत भोसले आणि अभिनेत्री सुगंधा मिश्रा या दोन कलाकारांच्या रिलेशनशिपबद्दल बऱ्याचदिवसांपासून चर्चा सुरु होत्या. मात्र काही काळाने या दोघांनीही आपले नाते जगजाहिर केले होते. इन्स्टाग्रामवर हे दोघे त्यांचे रोमॅन्टिक फोटो शेअर करायचे. आता या दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. २६ एप्रिल रोजी सुगंधा श्रर्मा आणि संकेत भोसले हे दोघे लग्न करणार आहेत. पंजाबमधील जालंधर येथे यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत खाजगी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्न आणि साखरपुडा एकाच दिवशी पार पडणार आहे. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार व्हावे याची काळजी संकेत भोसले स्वत: काळजी घेत आहेत.


हे वाचा- कबीर बेदीचे आत्मचारित्र ‘स्टोरीज़ आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द एक्टर’चे प्रियांका चोप्रा करणार प्रकाशन

First Published on: April 18, 2021 1:37 PM
Exit mobile version