‘या’ कालावधीत पार पडणार ‘एशियन फिल्म फेस्टिव्हल’

‘या’ कालावधीत पार पडणार ‘एशियन फिल्म फेस्टिव्हल’

एशियन फिल्म फेस्टिवल

एशियन फिल्म फांऊडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या सतराव्या ‘थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल’ पूर्वतयारी सुरु झाली आहे. या चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटाचा विशेष सहभाग असतोच. यासाठी १६ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहेत. यासाठी कोणतीही प्रवेश फी आकारण्यात आलेली नाही. मराठीत सध्या विविध आशयांवर निर्माण होत असलेल्या चित्रपटाना हा महोत्सव खूप मोठे व्यासपीठ ठरते आहे.

हे फेस्टिव्हल येत्या १३ ते २० डिसेंबर या दरम्यान संपन्न होणार आहे. गेल्या २ ते ३ वर्षात म्हणजेच २०१६ आणि २०१७ यावर्षात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना यात सहभागी होता येणार आहे. या महोत्सवासाठी आंतराष्ट्रीय ज्यूरी काम पाहणार आहेत.

तसेच या महोत्सवात लघुपटाचा विशेष भाग करण्यात आला आहे. या फेस्टिव्हलमध्ये सत्यजित रे मेमोरियल अवॉर्ड व एशियन फिल्म कल्चर अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. त्याचप्रामाणे कोणत्याही हिंदी -प्रादेशिक आणि विदेशी  भाषेतील चित्रपटांच्या सर्वोत्तम महिला दिग्दर्शिकेस गौरवण्यात येणार आहे. दरवर्षी या चित्रपट महोत्सवाला चित्रपट रसिक, तसेच अभ्यासक, विश्लेषक मोठ्या संखेने गर्दी करतात.

First Published on: September 10, 2018 6:23 PM
Exit mobile version