‘थलायवी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच, कंगणाचा दमदार अभिनय

‘थलायवी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच, कंगणाचा दमदार अभिनय

Thalaivii Box Office Collection : 'थलायवी' बॉक्स ऑफिसवर पहिल्या वीकेंडला गल्ला जमवण्यात ठरला अपयशी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हीच्या आगामी बहुचर्चित चित्रपट ‘थलायवी’ या चित्रपटाच्या प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. आज अखेर कंगनाच्या वाढदिवसादिवशी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री तथा अभिनेत्री ‘जयललिता’ यांच्या जीवनावर आधारित ‘थलायवी’ या चित्रपटाची पटकथा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास दाखवण्यात आला आहे. ट्रेलरमधील कंगनाचा दमदार अभिनय पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला जया असा आवाज येतो…आणि कंगनाची सुंदर झलक पाहायला मिळते. यानंतर वेगेवेगळ्या सीनमधून कंगनाने जयललिता यांची साकारलेली जबरदस्त भूमिका प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडते. जयललिता यांचा अभिनेत्री होण्याचा प्रवासादरम्यान कंगनाचा अतिशय उत्कृष्ट लुक चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच जयललिता यांचे एम.जे.आर बरोबरचे वैयक्तिक जीवनदेखील सुंदर पद्धतीने ट्रेलरमध्ये सादर केले आहे.

जयललिता यांनी एम. जी. रामचंद्रण यांच्याबरोबर राजकारणात कसा प्रवेश केला हे ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दाखवले आहे. ‘थलायवी’ या चित्रपटातील भूमिकेनुसार कंगणाला २० किलो वजन वाढवावे लागले आहे. अशा परिस्थितीत कंगनाला कठोर मेहनत घ्यावी लागली. यानंतर तिला नव्या चित्रपटासाठी पुन्हा एकदा स्लीमट्रीम व्हायचे होते हे तिचे सर्वात मोठे आवाहन होते. याचा खुलासा खुद्द कंगनाने तिच्या एका ट्विटमध्ये केला होता. एकंदरित या चित्रपटाचा ट्रेलर पाहता हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस येईल.


हे वाचा- Birthday Special: मिका सिंगच्या गाण्यातील स्मृती इराणींना ओळखलत का?

First Published on: March 23, 2021 2:14 PM
Exit mobile version