कंगनाच्या वाढदिवस दिनी ”थलायवी” चा ट्रेलर प्रदर्शित

कंगनाच्या वाढदिवस दिनी ”थलायवी” चा ट्रेलर प्रदर्शित

तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री तथा लोकप्रिय अभिनेत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित ”थलायवी” या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थलाइवी चित्रपटात काम करणारी मुख्य अभिनेत्री कंगना राणावत हीने आपल्या सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे. थलायवी या चित्रपटाची चर्चा गेले अनेक दिवसांपासून बॅालिवूड मध्ये रंगत आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत आहेत. आता खूद्द कंगनाने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवर याचा खूलासा केला आहे . ”जयललिताने वयाच्या १७ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल होते. तिचा पहिलाच चित्रपट थिएटरमध्ये १०० दिवस चालला होता!” २३ मार्चला कंगनाचा वाढदिवसही आहे. या खास दिवशी चित्रपटाचा  ट्रेलर रिलीज होणार आहे.


हे वाचा- प्राजक्ता माळीने घरात साजरा केला ‘हापूस आंबा महोत्सव’

First Published on: March 22, 2021 8:35 PM
Exit mobile version