नृत्याची अदा दाखवणारा ‘डान्स दीवाने सीझन २’ येतोय

नृत्याची अदा दाखवणारा ‘डान्स दीवाने सीझन २’ येतोय

माधुरी दीक्षितच्या 'डान्स दिवाने' च्या सेटवर तब्बल १८ जणांना कोरोनाची लागण

डान्स दीवाने या शोच्या मंचावर वयाचे बंधन असणार नाही, नृत्य हीच त्याची एकमेव भाषा असणार आहे आणि येथे फक्त खरी आवडच पाहिली जाणार आहे. वयाचे बंधन मोडून टाकणाऱ्या या मंचाला प्रेक्षकांचे प्रेम आणि प्रशंसा मिळाली होती आणि आता तो दुप्पट दीवानगीसह परत येत आहे.

एकाच नृत्य मंचावर देशातील तीन पिढ्यांना एकत्र आणणाऱ्या डान्स दीवाने या डान्स रिअॅलिटी शोचा दुसरा सीझन आणण्यासाठी कलर्स सज्ज झाला आहे. यहाँ दीवानगी नही किसी की कम…देखेंगे किस जनरेशन में है दम हे तत्व मुख्य गाभा असलेला हा नवीन सीझन तीन विविध वयाच्या गटांमधील नवीन ताज्या दमाच्या टॅलेंट स्पर्धक म्हणून घेऊन येत आहे आणि ते या सीझनच्या एकमेव डान्स दीवानेच्या ट्रॉफीसाठी लढणार आहेत.

या शोमधील स्पर्धेत स्पर्धकांना प्ले, पॉज आणि रिवाईंड हे घटकांचे आव्हान असणार आहे. विस्मयकारक तिकडी, बॉलीवूडची डान्सिंग दिवा माधुरी दीक्षित, नामवंत दिग्दर्शक शशांक खेतान, आणि उत्कृष्ट कोरियोग्राफर तुषार कालिया, परीक्षक म्हणून पुन्हा येणार आहेत आणि टेलिव्हिजनची धडकन असलेला अर्जुन बिजलानी होस्ट म्हणून पुन्हा येणार आहेत. ड्रीम्स व्होल्ट मिडिया द्वारे निर्मिती असलेला डान्स दीवाने हा शो सुरू होणार आहे १५ जूनपासून प्रत्येक शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता कलर्स वाहिनीवर प्रेक्षकांना भेटीस येणार आहे.

First Published on: May 31, 2019 9:00 AM
Exit mobile version