ट्विंकलने ‘त्या’ फोटोची तुलना केली केजरीवालांसोबत

ट्विंकलने ‘त्या’ फोटोची तुलना केली केजरीवालांसोबत

अभिनेत्री ट्विंकल खन्ना नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. ट्विंकल सोशलमिडीयावर खूप अक्टीव्ह ही असते. ती प्रत्येकवेळी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत परखडपणे मांडत असते. अनेकवेळा तिच्या बोलण्यावर चाहते नाराज होतात. तर काहीवेळा तीची वाहवा करतात. असाच ट्विंकलने ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोचा थेट संबंध तिने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी जोडला आहे.

हा फोटो शेअर करताना ट्विंकरने त्याच स्पष्टिकरणही दिलं आहे. ‘शप्पथ मी तिला असे काही करण्यासाठी सांगितलेले नाही,’ असा खुलासाही तिने केला आहे. ट्विंकलच्या या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. काहींना ट्विंकलचे हे वागणे खटकले तर काहींनी यावरून तिची जाम मजा घेतली. काहींनी तर अक्षय कुमार ज्या अंडरविअरची जाहीरात करतो तो हा ब्रँड नाही अशीही कमेंट केली आहे.

First Published on: April 21, 2019 2:35 PM
Exit mobile version