इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी”च टीजर पोस्टर लाँच

इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी”च टीजर पोस्टर लाँच

नावापासूनच चर्चेत आलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीचे टीजर पोस्टर लाँच करण्यात आले आहे. या पोस्टरवरून चित्रपट अतिशय धमाल आणि मनोरंजक असणार याचे संकेत मिळत असून, एप्रिल २०२०मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

कोल एलएलपीतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे तर फटमार फिल्म्स एलएलपीच्या नेहा गुप्ता, प्रसाद नामजोशी यांनी ब्लिंक मोशन पिक्चर्स, अभिषिक्ता इन्फोटेन्मेंट प्रा. लि.आणि कोल फिल्म्सच्या संकेत बियाणी, संदेश बियाणी, विकास वोहरा, सुशील कंठेड, रितेश चितलांगिया यांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. पर्यावरण अभ्यासक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर प्रसाद नामजोशी यांनीच पटकथा आणि संवाद लेखन केलं आहे. चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची इंडस्ट्रीत चर्चा आहे.

बास काय भावा, दुसऱ्यांना खाज आहे म्हणूनच आपल्याला माज आहे, निस्ता धूर अशा ओळी, गॉगल लावलेली बिनचेहऱ्याची व्यक्ती, विद्यापीठाची इमारत असे सारे या पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे एकूण पोस्टरचा बाज पाहता चित्रपट धमाल आणि मनोरंजक असेल असे संकेत मिळतात. आता या पोस्टरमुळे चित्रपटाचं कथानक काय, चित्रपटात आणखी कोण कलाकार आहेत याची उत्सुकता निर्माण झाली आहे. पण त्यासाठी एप्रिल २०२० पर्यंत वाट पहावी लागेल.

First Published on: January 11, 2020 9:27 AM
Exit mobile version