चला पुन्हा गावाकडे जाऊया…‘गाव पुढे आहे’!

चला पुन्हा गावाकडे जाऊया…‘गाव पुढे आहे’!

गावातून लोकं शहरांत का जातात? खरंतर त्यांना गावातच रोजगार उत्पन्न करून दिला तर स्थलांतराचा प्रश्नच निकाली निघेल. परंतु यासाठी अभ्यासू, तत्वनिष्ठ व पोटतिडकीने काम करणारी माणसं हवी. गावातले प्रश्न तिथेच मिटवले तर गावात सुधारणा होऊ शकते व शहर विरुद्ध गाव ही समस्या निष्कासित होऊ शकते. अशाच एका गावाची गोष्ट, जे एका तरुणाच्या प्रयत्नाने कसे पुढारते, ‘गाव पुढे आहे’ या चित्रपटातून सांगण्यात आली आहे.

एक तरुण अचानकपणे एका गावात येतो. आपली हुशारी, मेहनतीने व गावकऱ्यांच्या साथीने त्या गावाला प्रगतीपथावर नेतो. त्याच्या येण्यानंतर गावात खूप प्रगती होऊ लागते. गावातील भांडणतंटे दूर होतात. गावात आर्थिक सुबत्ता नांदू लागते. एके दिवशी तो तरुण अचानक गायब होतो व गावात चमत्कार होऊ लागतात. गावात भली मोठी फॅक्टरी उभी राहते, संपन्नता येते, त्या तरुणीच्या व इतरांच्या बँकेतील कर्ज फेडले जाते, अशा एक ना अनेक जादुई गोष्टी घडू लागतात. आश्चर्यचकित झालेले गावकरी विचारपूस करतात तेव्हा कळते की हे सर्व गर्भश्रीमंत अण्णासाहेब भोसले यांनी आपला मुलगा अविनाश भोसले याच्या सांगण्यावरून केले आहे. हे सर्व का व कसे होते हे ‘गाव पुढे आहे’ या चित्रपटातून मनोरंजकपणे मांडण्यात आले आहे.

नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. ‘गाव पुढे आहे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मुन्नावर शमीम भगत यांनी केले असून त्याची प्रस्तुती मीना शमीम फिल्म्सची आहे. पटकथा व संवाद मुन्नावर भगत यांचेच असून संगीत दिले आहे. चित्रपटात स्वप्नील विष्णू व अभिनेत्री पूजा जयस्वाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

First Published on: February 13, 2020 12:26 PM
Exit mobile version