उर्फी जावेदला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; थेट दिग्दर्शकाच्या ऑफिसमधून फोन…

उर्फी जावेदला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; थेट दिग्दर्शकाच्या ऑफिसमधून फोन…

Urfi Javed threatened by unknown person

उर्फी जावेद तिच्या बोल्ड आणि हटक्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी उर्फीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी नवीन रंजन गिरी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटकही केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा उर्फीला अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी उर्फीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. Urfi Javed threatened to Murder by Unknown person

रविारी उर्फी जावेदने तिच्या अधिकृत इंस्टग्राम स्टोरीमध्ये या प्रकरणाशी संबंधित अनेक किस्से शेअर केले आहेत. उर्फीच्या इस्टा स्टोरीमध्ये एक व्हिडिओदेखील आहे.

या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद स्वत:ला जीवे मारण्यच्या धमक्य़ा मिळाल्याचा दावा करताना दिसत आहे. ती म्हणाली माझ्या आयुष्याचा आणखी एक दिवस आणि मला आणखी एक दिवस धकम्या मिळत आहेत. आजारपणातही मला पोलीस ठाण्यात जावं लागतं आहे. त्या व्यक्तीकडे माझ्या गाडीचा नंबर आहे आणि ती व्यक्ती मला जीवे मारण्याची धमकी देत आहे.

उर्फी जावेदने लिहिले की, म्हणूनच मी म्हणाले की मीटिंपूर्वी प्रोजेक्ट्सचे सर्व तपशील जाणून घेणं आवश्यक आहे. यावर कथित सहाय्यक खरोखरच संतापला आणि म्हणाला नीरज पांडेचा अपमान करण्याची माझी हिंमत कशी झाली? त्याने मला सांगितलं की, त्याला माझ्या कारचा नंबर आणि सर्व काही माहित आहे आणि मी ज्याप्रकारचे कपडे घातले त्यामुळे मला धरुन मारलं पाहिजे. मी तपशीलाशिवाय मीटिंगला उपस्थित राहण्यास नकार दिल्याने त्याने मला ही धमकी दिली.

( हेही वाचा: प्रेग्नेंट सना खानला पतीने भर पार्टीतून नेलं ओढून; नेटकऱ्यांचा संताप )

यापूर्वीही मिळाली आहे धमकी 

गेल्यावेळी नवीन गिरी नावाच्या व्यक्तीने अनेक वेळा उर्फी जावेदला दूरध्वनी, व्हाॅट्सअॅपवर संदेश पाठवून बलात्कार करण्याची तसंच ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यात अश्लील भाषेचा वापर करण्यात आला होता. याबाबतची माहिती उर्फीने गोरेगाव पोलिसांना दिली होती. त्यानंतर एका महिला उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरुन शुक्रवारी पोलिसींनी नवीन गिरीविरुद्ध विनयभंगासह अश्लील शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देणे आदी भादवी कलमांतर्गत गुन्हा नोदंवून पोलिसांनी नवीन गिरीला अटक केली.

First Published on: April 17, 2023 10:11 AM
Exit mobile version