त्या व्हायरल व्हीडीओवर उर्वशी म्हणते…

त्या व्हायरल व्हीडीओवर उर्वशी म्हणते…

बॉलिवूडचे निर्माते जयंतलाल गडा यांच्या मुलाचे नुकतेच ग्रॅँड रिसेप्शन मुंबईत पार पडलं आहे. यावेळी बॉलिवूडकर खास नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. मात्र या रिसेप्शनचा एक व्हीडीओ सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. तो म्हणजे अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि बोनी कपूर यांचा. या व्हीडीओत बोनी कपूर उर्वशी चुकीच्या ठिकाणी हात लावताना दिसत आहेत.

या व्हीडीओवर उर्वशी म्हणते

हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर. नेटकऱ्यांनी बोनी कपूर यांना टार्गेट केल्यावर उर्वशीने ट्वीटकरून बोनी कपूर यांची बाजू घेतली आहे. उर्वशी म्हणते,सकाळी उठल्यावर मी सोशलमिडीयार बघितलं मला,बोनी कपूर यांच्याबरोबर ट्रोल केलं आहे. बोनी कपूर यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. ते एक सज्जन व्यक्ती आहेत. मिडीयाने हा व्हीडीओ व्हायरल करताना जराही विचार केला नाही की या चुकीच्या व्हायरल व्हीडीओमुळे बोनी सरांवर काय परिणाम होईल. मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी हे ट्रोलींग कृपा करून थांबवा.

First Published on: April 2, 2019 3:53 PM
Exit mobile version