सोशल मीडियाचा उपयोग जबाबदारीने करा

सोशल मीडियाचा उपयोग जबाबदारीने करा

अभिनेत्री सोनाली बेंद्रे

‘पसंत असलेली मुलगी सांगा, आम्ही तिला पळवून आणू,’ असे बेताल वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणणारे भाजपचे आमदार राम कदम यांनी हिंदी आणि मरठी सिनेसृष्टी मधील अभिनेत्री सोनाली बेंद्रेला जिवंतपणी श्रध्दांजली वाहिली होती. कोणतीही शाहानिशा न करता राम कदम यांनी टविट् केले होते. त्यावर सोनाली बेंद्रेचा पती गोल्डी बहल यांने ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी असे म्हटले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सोशल मीडियाचा उपयोग करताना तो जबाबदारीने करा असे आवाहन त्यांनी केले आहे.

काय म्हणाला सोनालीचा नवरा

सोनाली बेंद्रेचे पती गोल्डी बहल यांनी सांगितले आहे की, दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार राम कदम यांनी सोनाली बेंद्रेविषयी एक टविट् केले होते. त्यामध्ये त्यांनी हिंदी आणि मरठी सिनेसृष्टी मधील अभिनेत्री आणि एकेकाळी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड गेल्याचे टविट् केले होते. या टविट्नंतर त्यांच्यावर अनेकांनी सडकून टीका देखील करण्यात आल्या. ही बातमी वाऱ्यासारथी पसरली होती. मात्र यामुळे अनेकांच्या भावना देखील दुखावल्या गेल्या. एखादी पोस्ट करताना ती जबाबदारीने करा. अफवा पसरवू नका आणि त्यावर विश्वास देखील ठेवू नका असे देखील ते म्हाणाले आहेत.

सोनालीवर न्यूयॉर्क येथे उपचार सुरु

सोनाली सध्या कर्करोगसारख्या दुर्धर आजाराशी लढा देत आहे. या आजारातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी तिच्यावर न्यूयॉर्क येथे उपचार देखील सुरु आहेत. तिची आता तब्येत स्थिर असून कोणत्याही त्रासाशिवाय तिच्यावर इलाज सुरु आहेत. न्यूयॉर्क येथे उपचार घेत असताना सोनालीने आपले केस कापलेल्याचे फोटो देखील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर देखील केले होते.

First Published on: September 9, 2018 1:40 PM
Exit mobile version