उत्तरा केळकरचा ‘उत्तररंग’

उत्तरा केळकरचा ‘उत्तररंग’

Uttara Kelkar

कलाकार यशस्वी होतो. असे यश सहज प्रत्येकाच्या वाट्याला येते असे नाही. खडतर प्रवास केल्याशिवाय यशाचा मार्ग सापडत नाही हेही तितकेच खरे आहे. उत्तरा केळकर गायिका म्हणून आपल्या परिचयाची आहे. कॅसेटचे युग, चॅनलचे जाळे, सोशल नेटवर्कचे प्रस्त निर्माण होण्यापूर्वी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. खडतर प्रवास ते यशस्वी गायिका असा मोठा पल्ला त्यांनी संगीताच्या क्षेत्रात गाठलेला आहे. हा अनुभव वाचकांपर्यंत पोहोचावा यासाठी ‘उत्तररंग’ हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. ९ फेब्रुवारीला त्याचे प्रकाशन होणार आहे. गीत, संगीत, दिग्गजांचे अनुभव आणि प्रत्यक्ष उत्तरा केळकर यांच्याशी सुसंवाद असा हा कार्यक्रम विनामूल्य आहे जो दीनानाथ नाट्यगृहात रंगणार आहे.

जेवढी कारकीर्द मोठी तेवढा दिग्गजांचा अनुभव असे काहीसे उत्तरा केळकर यांच्या बाबतीत असल्यामुळे या प्रकाशन सोहळ्याला प्रवीण दवणे, अशोक पत्की, रवींद्र साठ्ये, श्रीधर फडके, विनय मांडके, सुदेश भोसले उपस्थित राहणार आहेत. ‘जीवनगाणी’ चे प्रसाद महाडकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केलेले आहे. प्रकाशित होणार्या पुस्तकात लता मंगेशकर, आशा भोसले, श्रीकांत ठाकरे, यशवंत देव यांच्याबद्द्लचा आदर व्यक्त केलेला आहे. आईवडील, भावंडे, सहकारी, चाहते, गुरुजन यांच्यासुद्धा आठवणी यात जागवलेल्या आहेत.

First Published on: February 8, 2019 5:43 AM
Exit mobile version