म्हणून संतप्त नेटकऱ्यांनी वीणा मलिकला पोहचवलं चंद्रावर!

म्हणून संतप्त नेटकऱ्यांनी वीणा मलिकला पोहचवलं चंद्रावर!

veena malik

२२ जुलैला श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपणकेंद्रावरून ‘चंद्रयान २’ झेपावले. मात्र केवळ चंद्रापासून २ किलोमिटर दूर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटला. हा प्रयोग अयशस्वी ठरला. पण तरी सुध्दा संपूर्ण देश Isro च्या बाजूने उभे राहिले. केवळ भारतातून नाही तर सगळ्या जगातून भारतीय वैज्ञानिकांचे कौतूक झाले. परंतु पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने भारताच्या चांद्रयान मोहिमेची खिल्ली उडवली आहे. विणा मलिक हिने एका मागून एक सलग तीन ट्विट करत भारतीय वैज्ञानिकांची खिल्ली उडवली आहे. मात्र नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

विणा मलिकने एका ट्विटमध्ये तर चक्क चंद्रयान मोहिमेऐवजी भारचाने शौचालयेच बांधावीत अशी प्रतिक्रीया दिली आहे. तिच्या या प्रतिक्रीयेवर नेटकऱ्यांनी तीचा खरपूस समाचार घेतला आहे.
‘तू पण सगळ्या क्षेत्रात फेल आहेस’, ‘भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये शौचालयाची जास्त गरज आहे’ अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. अनेकांनी विणा मलिकलाच चंद्रावर सोडायला हवं अशी टीका केली आहे.

६ सप्टेंबरला संपूर्ण देश ‘चंद्रयान २’ चे साक्षीदार होण्यासाठी रात्रभर जागा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशाने रात्रभर जागून Isro च्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवले. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटपर्यंत पोहोचले असताना संपर्क तुटला. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशातील जनतेच्या काळजाचा ठोका चुकला. यावेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला. संपूर्ण देशभरातून कौतूकाचा वर्षाव वैज्ञानिकांवर झाला.

First Published on: September 8, 2019 12:42 PM
Exit mobile version