जेष्ठ अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांचं निधन

जेष्ठ अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांचं निधन

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते दिन्यार कॉन्ट्रेक्टर यांचे निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते. गेले अनेक वर्ष ते आजाराशी झुंजत होते. दिन्यार बॉलिवूडच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनेता दिन्यार यांचे ५ जूनला सकाळी निधन झाले. यांच्यावर मुंबईच्या वरळी येथील प्रेयर हॉलमध्ये दुपारी साडे तीन वाजता अंतसंस्कार केले जाणार आहेत. वृध्दपकाळामुळे होणाऱ्या आजारामुळे ते गेले अनेक दिवस आजारी होते. दिन्यार यांनी बाजीगर,३६ चायना टाउन,खिलाडी आणि बादशहा या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भुमिका केल्या आहेत.

त्याचप्रमाणे ते अनेक लोकप्रिय शोचा हिस्सा झाले आहेत. दिनयार यांनी आपल्या करिअरची सुरूवात १९६६ साली नाटकांपासून केली. त्यांनी गुजराती आणि हिंदी नाटकांमधून कामं केली आहेत.

दिन्यार यांना २०१९ मध्ये पद्म्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

First Published on: June 5, 2019 12:07 PM
Exit mobile version