Breaking : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन!

Breaking : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन!

अभिनेते इरफान खान यांच्या निधनाचं दु:ख चित्रपटसृष्टीवर कोसळल्याला अजून २४ तास देखील झालेले नसताना आता सलग दुसऱ्या दिवशी चित्रपटसृष्टीला दुसरा धक्का बसला आहे. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं मुंबईमध्ये उपचारांदरम्यान निधन झालं आहे. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर त्यांची कर्करोगाची ही झुंज अपयशी ठरली असून त्यांचं आज सकाळी मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनावर चित्रपट सृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १५०हून जास्त भूमिका साकारल्या होत्या. यामध्ये त्यांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या.

१९५५ साली प्रदर्शित झालेल्या श्री ४२० या चित्रपटात त्यांनी प्यार हुआ इकरार हुआ या अजरामर गाण्यामध्ये एक छोटीशी भूमिका साकारून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर १९७० साली आलेल्या मेरा नाम जोकर सिनेमामध्ये त्यांनी राजूच्या तरूणपणीची भूमिका साकारली होती. यासाठी त्यांना सर्वोत्तम बालकलाकाराचा नॅशनल फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. मात्र, त्यांची प्रमुख भूमिकांची इनिंग सुरू झाली ती १९७३ साली प्रदर्शित झालेल्या बॉबी या सिनेमामधून. या सिनेमासाठी देखील त्यांना सर्वोत्तम अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अशा प्रकारे कारकिर्दीतल्या पहिल्या ३ सिनेमांमध्ये त्यांनी वडील राज कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली काम केल्यानंतर त्यांनी पुढे अनेक दिग्दर्शकांसोबत काम केलं.

ऋषी कपूर यांना कारकिर्दीत अनेक मोठे पुरस्कार त्यांच्या अभिनयासाठी आणि गाजलेल्या चित्रपटांसाठी मिळाले होते.

१९७० – मेरा नाम जोकरसाठी स्पेशल नॅशनल फिल्म अवॉर्ड
१९७४ – बॉबी सिनेमासाठई फिल्मफेअर अवॉर्ड
२००८ – फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड
२००९ – रशियन सरकारतर्फे चित्रपट क्षेत्रातल्या योगदानासाठी विशेष पुरस्कार
२०१० – लव्ह आज कल या सिनेमात विशेष सपोर्टिव्ह रोलसाठी अप्सरा फिल्म्स-टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्डचा पुरस्काकर
२०११ – दो दुनी चार सिनेमातल्या भूमिकेसाठी फिल्मफेअर क्रिटीक्स अवॉर्ड
२०१३ – अग्नीपथ सिनेमातल्या निगेटिव्ह भूमिकेसाठी टाईम्स ऑफ इंडिया फिल्म अवॉर्ड
२०१६ – स्क्रीन लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड
२०१७ – कपूर अॅण्ड सन्स सिनेमातल्या सपोर्टिव्ह भूमिकेसाठी स्क्रीन अवॉर्ड
२०१७ – कपूर अॅण्ड सन्स सिनेमातल्या भूमिकेसाठी फिल्मफेअर अवॉर्ड
२०१७ – कपूर अॅण्ड सन्ससाठी सर्वोत्तम सपोर्टिव्ह रोलसाठी झी सिने अवॉर्ड
२०१७ – कपूर अॅण्ड सन्ससाठी सर्वोत्तम विनोदी भूमिकेसाठी झी सिने अवॉर्ड

First Published on: April 30, 2020 9:51 AM
Exit mobile version