ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे कालवश

ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे कालवश

ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे काल रात्री त्यांच्या राहत्या घरी पार्ले येथे अकस्मात निधन झाले आहे. मराठी रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिका असा त्यांचा एकूण अभिनय प्रवास आहे. 1982 साली सुनील शेंडे यांनी गांधी या चित्रपटातून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती.

जमीन, यशवंत, आई, कृष्ण अवतार, वास्तव, सरफरोश, बॉम्बे बॉईज, जिद्दी, गुनाह, निदान अशा विविध चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. राजकारणी, पोलीस ऑफीसर, डाकू, सायंटिस्ट अशा विविधांगी भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या होत्या. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीतून रजा घेतली होती. त्यांना कोणत्याही प्रकारचा मोठा आजार नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र एपिलेप्सीच्या किरकोळ त्रासातून ते जात होते.

काल रात्री त्यांच्या राहत्या घरी त्यांना अचानक फिट येऊन ते पडले आणि त्यांना ताबडतोब नानावटी इस्पितळांमध्ये दाखल करण्यात आले. तेथे गेल्यावर त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आज दुपारी बारा वाजता त्यांचे शव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या पार्ले येथील घरी आणले जाणार असून लगेच दुपारी एक ते दोन वाजता अंधेरी येथील पारशी वाडा स्मशानभूमीत त्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात आता त्यांचा मुलगा, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे.

 


हेही वाचा :

समंथाचा ‘यशोदा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट, जमवला मोठा गल्ला

First Published on: November 14, 2022 11:56 AM
Exit mobile version