टॉलिवूडचे दिग्गज अभिनेते सरथ बाबू यांची प्रकृती चिंताजनक

टॉलिवूडचे दिग्गज अभिनेते सरथ बाबू यांची प्रकृती चिंताजनक

टॉलिवूडचे दिग्गज अभिनेते सरथ बाबू यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना सध्या हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. सरथ बाबू यांचे सर्व अवयव निकामी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सरथ बाबू यांना 20 एप्रिल रोजी अचानक प्रकृती खालावल्याने बंगळुरुहून हैदराबादला आणण्यात आले. रविवारी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.

सेप्सिस आजाराने त्रस्त आहेत सरथ बाबू

सरथ बाबू हे सेप्सिस या आजाराने त्रस्त आहेत. हा एक गंभीर आजार असून यात सर्व अवयव हळूहळू निकामी होऊ लागतात. या आजारामुळे सरथ बाबू यांची किडनी, यकृत आणि फुफ्फुसावर या आजाराचा परिणाम झाला आहे.

230 चित्रपटांमध्ये सरथ बाबू यांनी केलं आहे काम

सरथ बाबू यांचे पूर्ण नाव सत्‍यम बाबू दीक्षितुलु आहे. 1973 मध्ये एका तेलुगु चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सरथ बाबू हे तेलगू आणि तमिळ चित्रपटांमधील कामासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत 230 पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आहे. कन्नड, हिंदी, तमिळ आणि मल्याळम सिनेमात त्यांनी अभिनयाचा ठसा उमठवला आहे. त्यांना 9 नंदी पुरस्कार मिळाले आहेत.


हेही वाचा :

अरिजीत सिंहच्या दर्दभऱ्या आवाजामागचे ‘हे’ आहे कारण

First Published on: April 25, 2023 4:01 PM
Exit mobile version