Vicky Kaushal : ‘छावा’ चित्रपटातील विकी कौशलचा फर्स्ट लूक व्हायरल

Vicky Kaushal : ‘छावा’ चित्रपटातील विकी कौशलचा फर्स्ट लूक व्हायरल

आपल्या दमदार अभिनयाबद्दल ओळखला जाणारा अभिनेता विक्की कौशलने त्याच्या ‘छावा’ या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटामुळे विकी कौशल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शन असणारा हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित असणार आहे. महाराजांच्या भूमिकेत विकी कसा दिसेल, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. आता या भूमिकेतील त्याचा पहिलाच लूक समोर आला आहे.

झूम टीव्हीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर विकीचा छावा सिनेमातील एका लूकमधील फोटो शेअर केले. या फोटोमध्ये विकीने साधूंप्रमाणे पोशाख केला असून कपाळाला गंध, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, कवड्याची माळ, सदरा, कमरेला बांधलेला शेला आणि धोतर या लूकमध्ये विकी दिसतोय. सोशल मीडियावर त्याचा हा लूक चर्चेत आहे. या लूकवरून छत्रपती संभाजी महाराजांच्या एखाद्या गुप्त मोहिमेचा सीन शूट होत असावा असं वाटतंय. सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा : Anant Ambani Wedding : या आलिशान ठिकाणी होणार अनंत अंबानी आणि राधिकाचे लग्न

_________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

First Published on: April 24, 2024 1:08 PM
Exit mobile version