शुटींगदरम्यान विकी कौशलला गंभीर दुखापत

शुटींगदरम्यान विकी कौशलला गंभीर दुखापत

विकी कौशल

तरूणाईंच्या दिलों की धडकन म्हणजे अभिनेता विकी कौशल. ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटानंतर विकी कौशल याने सगळ्यांच्याच मनात घर केलं. सध्या विकी कौशल दिग्दर्शक भानु प्रताप सिंग यांच्या हॉरर सिनेमाचं शूटिंग करतोय. मात्र शुटींग दरम्यान विकी कौशलला गंभीर दुखापत झाली आहे. विकीच्या चेहऱ्यावर जवळपास 13 टाके पडले आहेत.

गुरूवारी रात्री एका अक्शन सीनच्या शुटींग दरम्यान विकी गंभीर जखमी झाला.विकीच्या चेहऱ्याला मार लागला आहे. त्याला एकूण १३ टाके पडले आहेत.  त्याला लगेचच स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर विकीला मुंबईच्या दवाखान्यात हलवण्यात आलं. विकीच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर लगेचच चित्रपटाच्या शुटींगला सुरूवात होईल.

 

First Published on: April 20, 2019 4:33 PM
Exit mobile version