‘व्हॅलेंटाईन डे’च्या आधी तरुणींच झालयं ‘हार्ट ब्रेक’!

‘व्हॅलेंटाईन डे’च्या आधी तरुणींच झालयं ‘हार्ट ब्रेक’!

विकी कौशल

बॉलीवूडचा हँडसम आणि अभिनयातही विशेष शैली असलेला अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या उरी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. उरी चित्रपट हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून विकीच्या अभिनयाचेही सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे त्याच्या उरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला असून अजूनही हा सिनेमा थिएटरमध्ये आहे. त्यामुळे विकी कौशलची क्रेझ तरुणाईमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र आता त्याच्या फिमेल फॅन्ससाठी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. उद्या, १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे असून त्याच्या काही तासांपूर्वी विकी कौशलने आपण रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे त्याच्या फिमेल फॅन्सचा नक्कीच हार्ट ब्रेक झाला असेल.

 

पाहताच पडला प्रेमात 

विकी कौशलने त्याची गर्लफ्रेंड हरलीन सेठीसोबतच नातं सर्वांसमोर जाहिर केलं असून त्यांचे काही फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तरुणींचा ड्रिम बॉय असणाऱ्या विकीच्या अफेअरबाबत ऐकल्यानंतर नक्कीच त्याच्या फॅन्सचे हार्ट ब्रेक झाले असणार आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत विकीने त्याची लव्ह स्टोरी सांगितली होती. हरलीन पाहताच आपण तिच्या प्रेमात पडलो, असे विकीने म्हटले होते.

First Published on: February 13, 2019 12:21 PM
Exit mobile version