VIDEO : श्रद्धा कपूरने महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटनांवर व्यक्त केलं दु:ख

VIDEO : श्रद्धा कपूरने महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटनांवर व्यक्त केलं दु:ख

VIDEO : श्रद्धा कपूरने महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटनांवर व्यक्त केलं दु:ख

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवत आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून श्रद्धाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. चाहते केवळ श्रद्धाच्या अभिनयाचेच नव्हे तर तिने गायलेल्या गाण्यांचे, तिच्या फॅशन, स्टाईल स्टेटमेंटचेही दिवाणे आहेत. बॉलिवूडची अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून ओळख असलेली श्रद्धा कपूर आज तिच्या सौंदर्याने आणि ग्लॅमरस स्टाईलने करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतेय. श्रद्धा तिच्या सौंदर्यामुळेच नाही तर आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे देखील चर्चेत असते. अशातच श्रद्धाने एक व्हिडिओ शेअर करत महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटनांवर दु:ख व्यक्त केलं आहे.

अलीकडेच, श्रद्धाने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कू वर यूएनच्या महिला प्रतिनिधी निशान सत्यम यांच्याशी झालेल्या संभाषणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात श्रद्धा महिलांवर दररोज होणाऱ्या घरगुती हिंसाचाराबद्दल बोलत आहे.

या संभाषणावेळी श्रद्धा थोडी भावूकही झाली होती. यावर श्रद्धा म्हणाली की, आजच्या स्त्रीला घरगुती हिंसाचार समजत नाही आणि दररोज होणारा अपमान स्वीकारत जाते. मात्र आजची स्त्री ‘इट्स ओके’ म्हणून सगळं टाळते का आहे?

या संपूर्ण संभाषणात श्रद्धा कपूरने शेवटी सांगितले की, जेव्हा महिला स्वतःवर होत असलेल्या अत्याचारांना वाचा फोडतील आणि एक पाऊल उचलतील, तेव्हाच समाजात एक नवी आशा निर्माण होईल आणि समाजात बदल घडू शकेल.


विद्यार्थ्यांचे इंग्रजी स्पष्ट होण्यासाठी पहिलीपासून दैनंदिन वापरातील शब्द शिकवावेत, शिक्षणमंत्र्यांच्या सुचना


First Published on: November 26, 2021 6:20 PM
Exit mobile version