रणवीरने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी दिल्या भन्नाट कमेंट्स!

रणवीरने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी दिल्या भन्नाट कमेंट्स!

सध्या बॉलिवूडमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचीच चर्चा असेत. म त्या दोघांचा फॅशन सेन्स असो किंवा दोघांचा खुले आम रोमांन्स असो. हे दोघे कायमच चर्चेत असतात. सध्या रणवीरने सोशलमिडीयावर शेअर केलेले फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोत रणवीर दीपिकाकडे एकटक बघत आहे. हा फोटो आहे राम लीलाच्या सेटवरचा.

रणवीरने हा गोड फोटो शेअर करत म्हटले आहे की, या फोटोला कॅफ्शनची गरज नाहीये. रणवीच्या या पोस्टवर केवळ त्यांचे चाहतेच नाही तर बॉलिवूड कलाकारही कमेंट्स करत आहेत. पण यात सगळ्याच लक्ष दीपिका पदूकोण ने केलेली कमेंट लक्ष वेधून घेत आहे. दीपिका म्हणते, ‘या सात वर्षात काहीच बदलले नाही’

लवकरच हे दोघे ८३ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. रणवीर कपिल देव च्या भुमिकेत दिसणार आहेत. तर दीपिका कपिल देवच्या बायकोच्या भुमिकेत दिसणार आहे. ८३ हा चित्रपट भारताने वल्ड कप जिंकला त्यावर आधारीत आहे.

First Published on: October 14, 2019 3:55 PM
Exit mobile version